लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लान; कधी, कुठे आणि किती जणांना मिळणार लस? वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांनाही लस देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर लहान मुलांना कोरोनाची लस देण्यासाठी मुंबई महापालिकेनेही कंबर कसली आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लान; कधी, कुठे आणि किती जणांना मिळणार लस? वाचा सविस्तर
COVID vaccine
विनायक डावरुंग

| Edited By: भीमराव गवळी

Dec 26, 2021 | 7:01 PM

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांनाही लस देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर लहान मुलांना कोरोनाची लस देण्यासाठी मुंबई महापालिकेनेही कंबर कसली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने मेगा प्लान तयार केला आहे. केंद्र सरकारकडून लसीकरणाची गाईडलाईन येताच 2 ते 3 दिवसात लहान मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेतून देण्यात आली आहे.

मुंबईत 15 ते 18 वयोगटातील 9 लाख लहान मुलांचं लसीकरण होणार आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये देखील असणार लसीकरण केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. इयत्ता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना सुलभ लसीकरणाची सोय व्हावी म्हणून ही व्यवस्था करण्यात येणार आहे.

350 लसीकरण केंद्रे निर्माण करणार

केंद्र शासनाकडून सविस्तर गाईडलाईन येताच 2-3 दिवसांत लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. प्रसुतीगृह आणि महापालिकेच्या रुग्णालयात 350 लसीकरण केंद्रे निर्माण करण्यात येणार असून या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण होईल. लस देण्यासाठीची सिरींज, निडल कदाचित वेगळी असेल, निडलची साईज काय असेल याबाबत स्पष्टता नाहीय. याबाबत केंद्र सरकारकडून सविस्तर गाईडलाईन येणं गरजेचं असल्याचं एका पालिका अधिकाऱ्याने सांगितलं.

1500 कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग

पुरेसा लससाठा करण्यासाठी शीतगृह आहेतच. मात्र, लहान मुलांसाठीच्या लसीकरता वेगळ्या तापमानाची आवश्यकता असेल का याबाबतही गाईडलाईननंतर स्पष्टता येईल. 1500 कर्मचाऱ्यांना लहान मुलांच्या लसीकरणासाठी ट्रेनिंग देण्यात आलंय. खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्सनाही ट्रेनिंग देणार आहे, असंही पालिकेतून सांगण्यात आलं.

रिअॅक्शन आल्यास पेडिएट्रीक वॉर्ड सज्ज

लहान मुलांच्या लसीकरणानंतर काही रिअॅक्शन्स आल्या तर यापूर्वीच उभारलेल्या पेडिएट्रीक वॉर्ड उभारण्यात आलेत, त्याचा वापर करता येऊ शकेल. लहान मुलांच्या लसीकरणाकरताही महापालिका जनजागृती मोहीम हातात घेईल. प्रायोगित तत्त्वावर ज्या लहान मुलांना आतापर्यंत लसी देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कोणतीही गंभीर रिअॅक्शन आढळलेली नसल्याचं सांगण्यात आलं.

संबंधितब बातम्या:

Mann Ki Baat: ओमिक्रॉनच्या विरोधात कसं लढायचं?, द्विसूत्री काय?; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ‘मन की बात’

Health care tips : मुलांची उंची वाढत नाही? मग ‘ही’ योगासने नियमित करायला लावा!

Omicron : जानेवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट? अलर्ट न झाल्यास स्थिती बिघडेल, तज्ज्ञांचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें