Omicron : जानेवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट? अलर्ट न झाल्यास स्थिती बिघडेल, तज्ज्ञांचा इशारा

लोक वेळीच सतर्क झाले नाहीत तर जानेवारीत दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट दस्तक देईल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

Omicron : जानेवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट? अलर्ट न झाल्यास स्थिती बिघडेल, तज्ज्ञांचा इशारा
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 7:17 AM

नवी दिल्ली : संपूर्ण देशात ओमिक्रॉन आणि कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतली स्थिती आणखी चिंताजनक आहे. कारण दिल्लीत मागील काही महिन्यातील मोठी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. दिल्लीत मागील चोवीस तासात 249 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. जी 13 जूननंतर सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. यामध्ये दिल्लीतल्या पॉझिटिव्ह रेटमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी घसरत आहे.

लोक वेळीच सतर्क झाले नाहीत तर जानेवारीत दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट दस्तक देईल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. चार महिन्यानंतर दिल्लीत झालेली सर्वात मोठी रुग्णवाढ देशातील इतर राज्यांसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्ताची रुग्णवाढ पाहता नव्या वर्षात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट येऊ शकते आणि स्थिती आणखी बिघडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ओेमिक्रॉनचा विळखा वाढला

ज्या पद्धीने झपाट्याने ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत त्यावरून अंदाज लावत तज्ज्ञानी दिल्लीत समूह संसार्गाची सुरूवात झाल्याचे मत व्यक्त केले आहे. ओमिक्रॉनचे असे अनेक रुग्ण आढळून येत आहेत ज्यांची कोणतीहीह ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. ओमिक्रॉनच्या कित्येक रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळून येत नसल्याने ओमिक्रॉनला रोखणे कठिण असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसात दिल्लीत दरदिवशी एक हजार कोरोना रुग्ण आढळून येतील असा अंदाही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचाही धोका वाढणार?

दिल्लीतली ही रुग्णवाढ महाराष्ट्रासाठीही चिंता वाढवणारी आहे, कारण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या आकड्यातही पुन्हा वाढ होत आहे. राज्यातही ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. प्रशासनाकडून पुन्हा काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत, राज्यात सध्या रात्रीची जमावबंदी लागू केली असून, हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा, जिम, सिनेमागृहे यांच्या वेळा आणि प्रवेश क्षमतेवरही काही निर्बंध लागू केले आहेत. लग्न संभारंभ, धार्मिक, राजकीय कार्यक्रमातील उपस्थिच्या संख्येवरही मर्यादा आणल्या आहेत.

Nashik NCP|आधी वाहनतळ, मगच टोइंग; नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आंदोलनाचा इशारा

अंबड ट्रक टर्मिनलचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे ठाकरे, गडकरींना साकडे

अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी जनतेने आम्हाला द्यावी, धनंजय मुंडेंचा पंकजांना अप्रत्यक्ष टोला

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.