AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video| दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

दादरच्या भाजी मंडईमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. यातून कोरोनाच्या प्रसाराची भीती निर्माण झाली आहे.

Video| दादरच्या भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई :  राज्यामध्ये कोरोनाचा संसर्गं वाढत आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात शिरकाव केला आहे. मात्र दुसरीकडे नागरिकांकडून सर्रासपणे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन सुरूच आहे. असाच प्रकार दादरच्या भाजी मंडईमधून समोर आला आहे. भाजी मंडई परिसरात ग्राहक मोठी गर्दी करत असून, कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे दादरच्या भाजीमंडईत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे. खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी तसेच व्यापाऱ्यांनी देखील मास्क घातलेला नाही. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जमावबंदीचे उल्लंघन

राज्यामध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील अनेक ठिकाणी जमावबंदीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

Anil Deshmukh : अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून वेगवान तपास, 12 बड्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

Temperature Update : राज्यभर थंडीचा कडाका वाढला; मुंबईसह सर्वत्र पारा घसरला

Mumbai | नाताळदिनी मुंबईत शून्य कोविड बळी, डिसेंबर महिन्यात सहाव्यांदा असं घडतंय!

Follow Us
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ