AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MUMBAI : नवीन वर्षात मुंबईकरांसाठी पाण्यात धावणारी ‘टॅक्सी’ मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान

नवीन वर्षात मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई 40 मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे प्रवास आणखी सुंदर होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी नववर्षाच्या तोंडावर हे मोठं गिफ्ट आहे.

MUMBAI : नवीन वर्षात मुंबईकरांसाठी पाण्यात धावणारी 'टॅक्सी' मुंबई ते नवी मुंबई प्रवास होणार वेगवान
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 25, 2021 | 3:06 PM
Share

मुंबई : नवीन वर्षात मुंबईकरांना एक अनोखं गिफ्ट मिळणार आहे. मुंबईकरांचा जलप्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. नवीन वर्षात मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी सुरू होणार आहे. येत्या 16 डिसेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी दोन्हीकडे जेट्टी  तयार करून ट्रायल रनही पार पडलं आहे. सध्या मुंबईकरांना नवी मुंबईत जाण्यासाठी रस्तेमार्गाचा आणि रेल्वेचा वापर करावा लागतोय. पण त्यात रोजचे काही तास घालवावे लागताहेत. त्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली ट्रॅफीकची समस्या प्रवाशांची डोकेदुखी वाढवत आहे.

मुंबईत ते नवी मुंबई फक्त 40 मिनिटात

या वॉटर टॅक्सीमुळे मुंबईकरांचा आताचा तासांवरचा प्रवास मिनिटांवर येणार आहेत. मुंबई ते नवी मुंबई 40 मिनिटात पोहोचण्याची शक्यता आहे. या जलमार्गामुळे प्रवास आणखी सुंदर होणार आहे,  त्याचबरोबर इंधनाची मोठी बचतही होणार होईल. मुंबईतील डोमेस्टीक क्रूज टर्मिनल प्रवाशांच्या स्वागतासाठी तयार असल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमन राजीव जलोटा यांनी सांगितलं आहे. या मार्गावर टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपनीची निवडही पूर्ण झाली आहे.

मुंबईला उपनगरांशी जलमार्गाद्वारे जोडणार

रोज नोकरी, कामधंद्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणी सुकर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी सेवा 12 मार्गावर तर 4 मार्गावर रोपेक्स सेवा सुरू करण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात प्रवास आणखी वेगवान होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि शहरांची वाढती व्याप्ती पाहून आणखी नव्या योजना आखण्यात येत आहेत. त्यातून या वॉटर टॅक्सीची संकल्पना आखण्यात आली आहे.  त्यामुळे प्रवाशांसाठी नववर्षाच्या तोंडावर हे मोठं गिफ्ट आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

RUGS: औरंगाबादेतही सूत्र हलली, नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त, स्थानिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

Bhediya First Look : वरुण धवन बनलाय खतरनाक ‘भेडिया’, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहिलात का?

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला