AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात…पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!

ही महिला 19 व्या मजल्यावर राहते आणि कपडे धुतल्यानंतर बाल्कनीतील दोरीवर ते सुकविण्याासाठी टाकत होती. तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती थेट 18 व्या मजल्यावर पोहोचली.

Video: कपडे वाळत घालताना आजीचा पाय सटकला, 19 व्या मजल्यावरुन थेट खाली, पण तितक्यात...पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ!
चीनमध्ये गगनचुंबी इमारतीवरुन वृद्ध महिला पडली
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 2:23 PM
Share

उंच इमारती पाहायला खूप भारी वाटतात, जणू त्या आकाशाला भिडताहेत सं वाटतं, त्यामुळेच अशा उंच इमारतींमध्ये राहण्याचे स्वप्न पाहणारे अनेक जण आहेत, पण काही वेळा या उंच इमारती धोकादायकही ठरतात. आता एक व्हायरल व्हिडिओ पाहून या इमारती किती धोकादायक आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता. चीनच्या जिआंगसू प्रांतातील यांगझू नावाच्या शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 19व्या मजल्यावरील बाल्कनीतून 82 वर्षीय महिला अचानक पडली. ती सरळ खाली पडत होती, पण तितक्यात ती 17 व्या मजल्यावर एका कपडे वाळत घालायच्या हँगरला लटकली. (Chine Old Woman fall from 19th floor in china chilling but rescue her video goes viral on social media)

ही महिला 19 व्या मजल्यावर राहते आणि कपडे धुतल्यानंतर बाल्कनीतील दोरीवर ते सुकविण्याासाठी टाकत होती. तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती थेट 18 व्या मजल्यावर पोहोचली. सुदैवाने महिलेचा पाय कपड्याच्या हँगरमध्ये अडकला. यावेळी तिचे डोके, हात आणि धड 17 व्या मजल्यावर लटकले होते. हे दृश्य हृदय हेलावून टाकणारं आहे.

पाहा व्हिडीओ:

सुदैवाने महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहोचले, जिथे एका टीमने महिलेचे पाय 18व्या मजल्यावर धरले, तर दुसऱ्या टीमने 17व्या मजल्यावरून तिच्या अंगाला दोरी बांधली. अशाप्रकारे महिलेला इमारतीत सुरक्षितपणे बाहेर काढण्यात बचावकर्त्यांना यश आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वृद्ध महिला घाबरली आहे, पण तिला गंभीर दुखापत झाली नाही.

महिलेला वाचवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 9,000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर महिलेचा जीव वाचवल्याबद्दल अग्निशमन दलाच्या जवानांचेही लोक कौतुक करत आहेत.

व्हिडिओ पाहून एका यूजरने ‘सॅल्युट टू द रेस्क्यूअर्स’ अशी कमेंट केली आहे, त्याचवेळी दुसऱ्या यूजरने ‘अग्निशमन दलाचे अद्भुत काम’ असे लिहिले आहे. एका युजरने ‘ती महिला 18व्या मजल्यावरच्या कपड्यांच्या हँगरमुळे वाचली’ अशी कमेंटही केली आहे.

हेही पाहा:

Video: हाय हिल्स आणि स्कर्ट घालून तरुणीचा जबरदस्त बॅक फ्लिप, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

हा फोटो पाहून कुणी म्हणू शकतं, आई कुठं काय करते?, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो

 

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...