Video: हाय हिल्स आणि स्कर्ट घालून तरुणीचा जबरदस्त बॅक फ्लिप, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, हाय हील्स आणि लाल स्कर्ट घातलेली पारुल अरोरा रस्त्यात बॅक फ्लिप मारताना दिसत आहे.

Video: हाय हिल्स आणि स्कर्ट घालून तरुणीचा जबरदस्त बॅक फ्लिप, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक
हाय हिल्स आणि स्कर्ट घालून जबरदस्त बॅकफ्लिप

सध्या एका हाय हिल्स घातलेल्या आणि स्कर्ट घालून बॅक फ्लिप मारणाऱ्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या मुलीने हाय हिलची सँडल घातली आहे, जी घालून व्यवस्थित चालणं कठीण आहे, पण या मुलीचं बँलंसिंग उत्तम आहे. ही मुलगी जिम्नॅस्ट पारुल अरोरा आहे, जी तिच्या अप्रतिम बॅक फ्लिपसाठी सोशल मीडियावर ओळखली जाते. आता स्कर्ट आणि हाय हिल्समधील तिचा हा नवीन व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहेत. (Amazing Stunt by Girl did a tremendous back filp in high heels Parul Arora viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, हाय हील्स आणि लाल स्कर्ट घातलेली पारुल अरोरा रस्त्यात बॅक फ्लिप मारताना दिसत आहे. बॅक फ्लिप करताना तिने ज्या पद्धतीने सॉफ्ट लॅंडिंग केलं आहे, ते थक्क करणारं आहे. तिची टाच किती लांब आहे ते तुम्ही पाहू शकता. ती ही फ्लिप अगदी सहज करते.

पाहा व्हायरल व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Parul_Arora💫 (@parul_cutearora)

हा व्हिडिओ स्वतः पारुल अरोराने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 12 नोव्हेंबरला शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाख 39 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. पारुल अरोराचा हा पराक्रम पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘पारुल, तू हाय हिल्समध्ये अप्रतिम बॅक फ्लिक केले आहेस. मी माझ्या स्नीकर्समध्येही असे काही करू शकणार नाही.’ त्याच वेळी, आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे, ‘सावधगिरी बाळगा…अशाने पाय मोडू शकतो.’ एकूणच युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

पारुल अरोरा ही मूळची अंबाला, हरियाणाची आहे. ती राष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टही राहिली आहे. आता ती फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आणि महिलांना प्रेरित करण्यासाठी जिम्नॅस्टिक करते. पारुलने साडीमध्ये बॅक फ्लिक करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिची मोठी बहीणही जिम्नॅस्टिक प्रशिक्षक आहे. साडीतही जिम्नॅस्टिक्स करता येतात, असं कधीच कुणाला वाटलं नसेल. पण पारुलने हे सुद्धा केले होते. त्याचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की अनेक सिनेसृष्टीतील व्यक्तींनीही त्याचे कौतुक केले.

हेही पाहा:

हा फोटो पाहून कुणी म्हणू शकतं, आई कुठं काय करते?, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो

Video: शास्रीय संगीताचा आनंद लुटणारी मांजर पाहिलीय, कुमार विश्वास यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI