AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 4 अडचणी, जर सुधारणा केली नाही तर…

भारत विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला होत आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या दृष्टीकोनातून जीवाची बाजी लावतील. कारण या सामन्यात पराभव कोणत्याही संघाच्या चाहत्यांना मान्य नसेल. असं असताना टीम इंडियाच्या चार उणीवा उघड झाल्या आहेत. चला जाणून घेऊयात...

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 4 अडचणी, जर सुधारणा केली नाही तर...
IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या 4 अडचणी, जर सुधारणा केली नाही तर...Image Credit source: Asian Cricket Council
| Updated on: Feb 13, 2026 | 5:58 PM
Share

IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना् भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आतापासूनच लागून आहे. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. पण खेळ म्हटलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. कारण एक चूक आणि पराभव हे निश्चित आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी या स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं करण्याचं दोन्ही संघांचा मानस आहे. असं असताना टीम इंडियाची कमकुवत बाजू या स्पर्धेतील दोन सामन्यात उघड झाली आहे. त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो. खासकरून दुबळ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गोष्टी तीव्रतेने दिसून आली. चला जाणून घेऊयात टीम इंडियाच्या 4 कमकुवत बाबी

अभिषेक शर्मा

अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाल्यानंतर चाहत्यांना नाराज केलं आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात खेळला नाही आणि पाकिस्तानविरूद्ध खेळेल की नाही ते माहिती नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या एक दोन सामन्यात खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढेल.

रिंकु सिंह

रिंकु सिंहचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. स्पर्धेपूर्वी त्याचा फॉर्म होता. मात्र अचानक त्याला नजर लागल्यासारखं वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या सामन्यात 14 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून बाद झाला. यात त्याने एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याची भीती वाटत आहे.

फिरकीचं जाळं

भारतीय संघ गेल्या काही महिन्यात फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गडदपणे अधोरेखित झालं. नामिबियाचे फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्ज आणि गेरहार्ड इरास्मस यांच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले. पाकिस्तानकडे फिरकीची मजबूत फळी आहे. त्यांचा सामना करताना भारतीय फलंदाज अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

पावरप्लेमध्ये सुमार गोलंदाजी

पावरप्लेच्या सहा षटकात भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. नामिबियाने या सहा षटकात भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. नामिबियाने 6 षटकात 1 गडी गमवून 57 धावा केल्या. त्यावरून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानविरुद्ध पावरप्ले निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे गोलंदाजांना अजून चांगलं काम करावं लागणार आहे.

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..