AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: उस्मान तारीकचं हाड टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! महेंद्रसिंह धोनीमुळे मिळाली कलाटणी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा मिस्ट्री गोलंदाज उस्मान तारिककडे लागून आहे. त्याच्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे भारतीय फलंदाज अडचणीत येण्याची शक्यता आहे.

IND vs PAK: उस्मान तारीकचं हाड टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! महेंद्रसिंह धोनीमुळे मिळाली कलाटणी
उस्मान तारीकचं हाड टीम इंडियासाठी धोक्याची घंटा! महेंद्रसिंह धोनीमुळे मिळाली कलाटणीImage Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Feb 13, 2026 | 5:11 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारत पाकिस्तान सामन्याकडे खिळल्या आहेत. या सामन्यावर पाकिस्तानने आधी बहिष्कार टाकला होता. मग घुमजाव केलं आणि खेळण्यास तयार झाले. अजूनही या सामन्यापूर्वीचा ड्रामा काही संपलेला नाही. या सामन्यात भारतीय खेळाडू हस्तांदोलन करणार का? वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेत आहे. अशा स्थिती भारत पाकिस्तान सामन्याचा काय निकाल लागतो याकडे लक्ष असणार आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं आहे. तर भारतीय संघ नामिबियाला पराभूत करून नुकताच श्रीलंकेला पोहोचला आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. असं असताना भारतीय संघाला 28 वर्षीय पाकिस्तानी फिरकीपटू उस्मान तारिकची भीती आहे. कारण त्याची अनोखी गोलंदाजी शैली फलंदाजांना कळणं कठीण जात आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उस्मान तारिकने या स्पर्धेत एकच सामना खेळला आहे आणि तीन विकेट घेतल्या आहेत. त्यात भारतीय फलंदाज फिरकीचा सामना करताना अडचणीत येत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात उस्मानची गोलंदाजी शैली भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकते. गोलंदाजी करताना त्याचा हात खालून येतो. त्याला साइट आर्म असं म्हंटलं जातं. तसेच चेंडू सोडताना थोडा थांबतो. त्यामुळे चेंडू सावकाश येतो. पण या दरम्यान, वेगाने टाकण्याची कलाही त्याने आत्मसात केली आहे. इतकंच काय चेंडू वळतो देखील.. त्यामुळे फलंदाजी करताना त्याचा अभ्यास करणं कठीण जाणार आहे.

उस्मान तारिकने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘माझ्या हातात दोन कोपरं आहे. त्यामुळे माझा हात नैसर्गिकरित्या वाकतो. माझी चाचणी झाली असून मी निर्दोष ठरलो आहे. प्रत्येकाला वाटतं की मी हात वाकवतो. पण माझा हात जैविक कारणाने वाकतो.’ हातातलं वेगळेपण त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळं करते. त्याचा उस्मान तारिक पुरेपूर फायदा घेत आहे. दुसरीकडे, उस्मान दुबईत सेल्समनचं काम करत होता. त्याच्याकडे चांगली नोकरी होती. पण क्रिकेटचं वेड काही सुटत नव्हतं. यावेळी त्याने एमएस धोनीचा बायोपिक पाहिला आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. धोनीने तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून क्रिकेटकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. तसेच उस्मान नोकरी सोडून पाकिस्तानला परतला आणि क्रिकेट खेळू लागला.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात