AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: शास्रीय संगीताचा आनंद लुटणारी मांजर पाहिलीय, कुमार विश्वास यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा!

या व्हिडिओमध्ये एक मांजर गझलवर डोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती इतकी शांत दिसत आहे की क्वचितच कोणतीही मांजर इतक्या आरामात बसू शकते.

Video: शास्रीय संगीताचा आनंद लुटणारी मांजर पाहिलीय, कुमार विश्वास यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहा!
गाण्याचा आनंद लुटणारी मांजर
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 1:10 PM
Share

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे जिथं जे काही अपलोड केले जातं, ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. दररोज काही ना काही व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत. तुम्ही जेव्हा सोशल मीडियावर स्क्रोल करता, तेव्हा प्राण्याचे एक-दोन व्हिडिओ तर सहजच दिसत असतील. काहीवेळा प्राणी देखील अशा गोष्टी करतात, जे याआधी कुणीही पाहिल्या नसतील आणि जर त्यांच्या विचित्र कृत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले गेले तर ते नक्कीच व्हायरल होतात. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ एका मांजरीचा आहे, ज्यामध्ये मांजर एका गझलवर नाचताना दिसत आहे. ( Poet Kumar Vishwas Share a Video of the cat was swinging on the song of ghazal)

हा व्हिडिओ कविराज कुमार विश्वास यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मांजर गझलवर डोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती इतकी शांत दिसत आहे की क्वचितच कोणतीही मांजर इतक्या आरामात बसू शकते. खरंतर ती मांजर पार्श्वभूमीत चालू असलेल्या गझलचा खूप आनंद घेत असते आणि काही वेळ ती मांजरही मस्तीत डोलायला लागते. हा व्हिडिओ पाहून लोक खूप गोंधळलेले दिसत आहेत आणि कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की ही खरोखर मांजर आहे का!

पाहा मांजरीचा व्हायरल व्हिडीओ:

व्हिडिओ शेअर करताना कविराज कुमार विश्वास यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही मांजर मागील जन्मात तानसेनजींच्या घरी असावी.’ या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सना खूप पसंती मिळत आहे, त्याचबरोबर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. तुम्ही मांजरीचा असा व्हिडिओ क्वचितच पाहिला असेल. लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 41.6 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचवेळी शेकडो लोकांच्या कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करताना लिहिले, ‘ही मांजर खूप गोंडस आहे’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले, व्हिडीओ पाहून मैफिलीत समोरच्या रांगेत मांजर काकू बसल्यासारखे दिसते. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही पाहा:

Video: लग्न मंडपात जाण्याआधी नवरी पोहचली जीममध्ये, पाहा नववधूचा स्वॅग, नेटकऱ्यांकडून कौतुक

कासवाने केलं प्रयोगशाळेचं उद्घाटन, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, उद्घाटनाचा प्रयोगही भन्नाट आहे!

 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.