AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कासवाने केलं प्रयोगशाळेचं उद्घाटन, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, उद्घाटनाचा प्रयोगही भन्नाट आहे!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कासवाने पाने आणि डहाळ्यांनी बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. हा व्हिडीओ 2015 सालचा असला, तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

कासवाने केलं प्रयोगशाळेचं उद्घाटन, व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले, उद्घाटनाचा प्रयोगही भन्नाट आहे!
कासवाने विज्ञान प्रयोगशाळेचं उद्घाटन केलं
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 10:40 AM
Share

जर तुम्ही इंटरनेटच्या दुनियेत सक्रिय असाल तर तुम्हाला माहित असेल की दररोज काही ना काही मजेदार व्हिडिओ असतात. यामध्ये अनेक गोष्टी हसण्यासारख्या आहेत, तर काही गोष्टी पाहून आश्चर्य वाटते, पण इथं अनेक अशाही गोष्टी व्हायरलही होतात, ज्या पाहून आपला दिवस आनंदात जातो. तुम्ही आजपर्यंत प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण तुम्ही कधी कासवाने एखाद्या वास्तूचं उद्घाटन करताना पाहिले आहे का?, नाही तर हा व्हिडीओ तुमच्यासाठीच आहे. (Animal Video Turtle inaugurated science lab by cutting ribbon made of leaves Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कासवाने पाने आणि डहाळ्यांनी बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. हा व्हिडीओ 2015 सालचा असला, तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार, चार्ल्स डार्विन असे या कासवाचे नाव असून त्याला निसर्गवादी आणि टीव्ही अँकर ख्रिस पॅकहॅम यांनी हाताने पकडले आहे, जेणेकरून तो पानांपासून बनवलेल्या फिती कुरतडून विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करू शकेल.

हा व्हिडीओ पाहा

हा मनमोहक व्हिडिओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, ‘लिंकन विद्यापीठात एक कासव नवीन विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करत आहे. या व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत 12 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय यूजर्स कमेंट्सच्या माध्यमातून स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘कासवालाही असंच वाटत असेल की, ओपनिंग ठीक आहे. पण मला पूर्ण जेवण तरी करू द्या! दुसरीकडे, दुसर्‍या नेटकऱ्याने लिहिले की, मी आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वोत्तम उद्घाटन आहे, खरंच आश्चर्यकारक!. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

हेही पाहा:

Video: तळकोकणाच्या जैवविविधतेची आणखी एक पाकळी उमलली! वेंगुर्ल्यात अतिदुर्मिळ पोवळा सापाचे दर्शन

Viral Video: बेचकीने एक एक फांदी उडवली, नेटकरी म्हणाले, हा कलियुगातला अर्जून आहे!

 

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...