Video: तळकोकणाच्या जैवविविधतेची आणखी एक पाकळी उमलली! वेंगुर्ल्यात अतिदुर्मिळ पोवळा सापाचे दर्शन

हा साप अतिविषारी सापांच्या प्रकारात मोडतो. दगडाखाली वा पालापाचोळ्याखाली हा राहतो. पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुणालाही हा मन्यार असल्याचा भास होऊ शकतो

Video: तळकोकणाच्या जैवविविधतेची आणखी एक पाकळी उमलली! वेंगुर्ल्यात अतिदुर्मिळ पोवळा सापाचे दर्शन
कोकणात सापडलेला अतिदुर्मिळ पोवळा साप
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 6:01 PM

सिंधुदुर्ग: आपला कोकण जैवविविधतेने संपन्न आहे. मात्र काळाच्या ओघात, माणसाने निसर्गाला ओरबाडण्यास सुरुवात केली, आणि त्याचे परिणाम कोकणातही दिसू लागले. समुद्रातून मासळी गायब व्हायला सुरुवात झाली, समुद्र किनाऱ्यांवर बोटींमधल्या तेलाचे तवंग यायला लागले, सांडपाण्याने समुद्र खराब झाले, जमिनी नापीक झाल्या आणि आधी कोकणाला कधीही न धडणारी वादळही कोकणाचं नुकसान करु लागली. मात्र, गेल्या काही काळापासून कोकणात परत निसर्ग जिवंत झाल्यासारखं वाटू लागलं आहे. याचंच एक उदाहरण समोर आलं आहे, कोकणात दुर्मिळ अशा पोवळा सापाचं दर्शन झालं आहे. याला इंग्रजीत castoes coral snake म्हटलं जातं. (Extremely rare castoes coral snake found in Vengurla, Konkan)

काय आहे या सापाचं वैशिष्ट्य

हा साप अतिविषारी सापांच्या प्रकारात मोडतो. दगडाखाली किंवा पालापाचोळ्याखाली हा राहतो. पहिल्यांदा पाहिल्यानंतर कुणालाही हा मन्यार असल्याचा भास होऊ शकतो, पण हा अतिदुर्मिळ असा castoes coral snake आहे. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली आहे. हा मुख्यत: छोटे बेडूक, सरडे, पाली आणि गांडूळ खातो. याची लांबी दोन ते अडीच फूट असते, तर हा करंगळी इतकाच जाड असतो. मात्र पहिल्या नजरेत हा सडपातळ असला तरी भलामोठा भासतो. या सापाच्या डोक्यावर भगवी जाड रेष असते. सापाला शिकाऱ्याची भिती वाटली तर हा शेपटी गोल करतो आणि ती जमिनीवर आपटून जवळ न येण्याचा इशारा देत असतो.

पाहा अतिदुर्मिळ पोवळा सापाचा व्हिडीओ:

कुठे सापडला हा साप

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात हा साप आढळला आहे. सर्पमित्रांनी सापाची ओळख केल्यानंतर त्याला रेस्क्यु केलं, आणि नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडलं. वनविभागाला या सापाची माहिती देण्यात आली आहे, दुसऱ्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा साप आढळल्याने, या सापाचा समावेश आता जिल्ह्याच्या वन्यजीव नोंदीत करण्यात येणार आहे. शिवाय, यावर लवकरच एक शोधनिबंधही प्रकाशित होणार असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं आहे.

हेही पाहा:

Viral Video: बेचकीने एक एक फांदी उडवली, नेटकरी म्हणाले, हा कलियुगातला अर्जून आहे!

Video: सिंहाच्या पिंजऱ्याच्या दगडावर जाऊन बसला, सिंह पकडणार तोच…पाहा हादरवणारा व्हिडीओ!

Video: ‘ही शिक्षिका काळी आहे, ती मला चिडवते’, म्हणत विद्यार्थिनीने शिक्षिकेवर हात उचलला, अमेरिकेतील वर्णभेदाची आणखी एक कहाणी

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.