Breaking : लॉकडाऊन अटळ? महापौरांनी सांगितलेला आकडा मुंबईनं ओलांडला, आता पुढं काय?

मुंबईकरांना काळजी करायला लावणारी रुग्णवाढ आज (6 जानेवारी) नोंदवली गेली आहे. मुंबई आज तब्बल 20 हजारपेक्षा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Breaking : लॉकडाऊन अटळ? महापौरांनी सांगितलेला आकडा मुंबईनं ओलांडला, आता पुढं काय?
मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:58 PM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  (Mumbai Mayor Kishor Pednekar)यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लॉकडाऊनबाबत विधान केलं होतं. मुंबईत जर 20 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले, तर लॉकडाऊनसारखा (Lockdown) कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होती. दरम्यान, आज 20 हजारपेक्षा (20 Thousand plus Corona cases in Mumbai) जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर एकट्या मुंबईत पडली आहे. त्यामुळे आता महापौरांनी दिलेला इशारा सत्यात उतरणार का? खरंच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत (Corona Third Wave) मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय.

पाहा 4 जानेवारी रोजी महापौर काय म्हणाल्या होत्या?

20 हजारपेक्षा जास्त रुग्णवाढ!

मुंबईत आज विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. मुंबई तब्बल 20 हजारपेक्षा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान आज मुंबईत झालं आहे. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लक्षण नसलेल्यांची संख्या लक्षणीय!

दिवसभरात मुंबईत 20 हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणतीही लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही. अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलंय दरम्यान, आज रुग्णालयात एकूण 1 हजार 170 रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसभरात एकूण 2 हजार 837 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर तब्बल 67487 इतक्या चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.

आता लॉकडाऊन अटळ?

लॉकडाऊन केव्हा लागणार, याबाबत महापौरांना प्रश्न विचारण्यात आला होता. मुंबईचे आयुक्तही याबाबत बारकाईनं लक्ष ठेवून असल्याची माहिती मुंबईच्या महापौरांनी दिली आहे. कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, याबाबतही पालिका खबरदारी घेतेय. लॉकडाऊन पुन्हा लागलं, तर पुन्हा सगळ्यांचं कंबरडं मोडेल, अशी भीती महापौरांनी व्यक्त केलं होतं. नियम पाळले गेले, तर लॉकडाऊनची गरजच लागणार नाही, असंही महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलंय. 20 हजारचा आकडा पार झाला, तर केंद्रानं दिलेल्या निर्देशांनुसार कडक पावलं उचलावी लागतील, असाही इशारा महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला होता. आता केंद्रानं लॉकडाऊनबाबतचे सगळेच निर्णय घेण्याबाबतचे अधिकार हे राज्यांना दिलेले आहेत. त्यामुळे आता राज्यसरकार आणि पालिक प्रशासन केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या निर्देशांप्रमाणे मुंबईबाबत काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचंय.

इतर बातम्या –

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार

शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

Corona Updates: लॉकडाऊन, मुंबई लोकल ते राजकीय सभा, पवारांनी टोपेंना कोणत्या सूचना दिल्या?

लोकल प्रवासावर निर्बंध आणणार?, गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली; कोणत्याही क्षणी घोषणेची शक्यता

दिवसभरात राज्यात किती रुग्णवाढ, पाहा व्हिडीओ –

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.