शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?
आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आरोग्यमंत्री यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 06, 2022 | 3:33 PM

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. कोरोनाची ही तिसरी लाट थोपवण्यासाठी विविध शहर आणि जिल्ह्यांमध्ये कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. मात्र संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोनासंबंधी आढावा बैठक झाली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार आणखी वाढू नये, याकरिता काय उपाययोजना करता येतील यासंबंधी चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले,
– मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या भयंकर वेगाने वाढते आहे. मात्र अद्याप येथील लोकल बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
– जिल्हाबंदीविषयी विचारल्यास, राजेश टोपे म्हणाले, सध्या तरी जिल्हाअंतर्गत बंद घालण्याची गरज वाटत नाही.
– विकेंड लॉकडाऊनविषयी राजेश टोपे म्हणाले, येत्या दोन दिवसातील परिस्थितीचा आढावा घेऊन याविषयी निर्णय घेतला जाईल.
– हॉटेल्स, मॉल्स बंद करणार का, असा प्रश्न विचारल्यास राजेश टोपे म्हणाले, आज मुंबई, ठाणे, पुणे, आदी शहरांमध्ये हळू हळू शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पण शाळा-कॉलेज बंद करून मुले हॉटेल्स, मॉल्समध्ये फिरणार असतील तर यावर काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल.
– राज्यात अनावश्यक गोष्टींसाठी मेळावे, एकत्र येण्यावर आता कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला.

इतर बातम्या-

Nagpur | मेडिकल व मेयोच्या पाहणीत पालकमंत्र्यांना काय दिसले?; ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज राहणार!  

IND vs SA: ‘तुम्ही जोहान्सबर्ग कसोटी जिंका हेच त्याच्यासाठी बेस्ट बर्थ डे गिफ्ट’, गावस्करांची टीम इंडियाला विनंती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें