Nagpur | मेडिकल व मेयोच्या पाहणीत पालकमंत्र्यांना काय दिसले?; ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज राहणार!  

Nagpur | मेडिकल व मेयोच्या पाहणीत पालकमंत्र्यांना काय दिसले?; ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज राहणार!  
प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेताना पालकमंत्री नितीन राऊत.

ओमिक्रॉनचे वाढते संक्रमण व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 3:21 PM

 नागपूर : ओमिक्रॉन संक्रमितांची वाढती रुग्णसंख्या व कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचाव करणे आवश्यक आहे. ऑक्सिजन खाटा, आयसीयू कक्ष, बालकांसाठी स्वतंत्र वार्ड, ऑक्सिजनची उपलब्धता तसेच अनुषंगिक सर्व वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयास (मेयो) भेट दिली. कोविड वार्ड, खाटांची संख्या, ऑक्सिजन प्लाँट, मनुष्यबळ आदी बाबींची पाहणी केली. जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातूरकर यावेळी उपस्थित होते.

100 खाटांचे स्वतंत्र कोविड वार्ड

या पाहणी दौऱ्यात पालकमंत्र्यांनी एम्स येथील कोविड वार्ड, ऑक्सिजन खाटांची संख्या, कोविड चाचणी प्रयोगशाळेची पाहणी केली. ओमिक्रॉनचे वाढते संक्रमण व कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता एम्स प्रशासनाने डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले. सध्या याठिकाणी डॉक्टरांच्या एकूण 50 पदांपैकी 43 पदे भरलेली आहेत तर 7 पदे रिक्त आहेत. ओमिक्रॉन बाधितांसाठी व संशयित कोविड बाधितांसाठी 100 खाटांचे स्वतंत्र कोविड वार्ड उभारण्यात आले आहे. 40 आयसीयू खाटा, 25 व्हेंटिलेटर, चाचणी प्रयोगशाळा आदी सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोविड बाधितांसाठी 160 खाटांचे वार्ड सध्या कार्यरत आहे. 340 ऑक्सिजनयुक्त खाटांचे स्वतंत्र वार्ड चौथ्या माळ्यावर तयार करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकीय, नर्सिंग कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. कोविडेतर रुग्णांसाठीही एम्समध्ये स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे. एम्समध्ये 400 सिलेंडची क्षमता असेलेले चार पीएसए प्लाँट निर्माण होत आहे. याव्दारे 30 किलोग्रॅमचे 458 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची उपलब्धता होईल, अशी माहिती डॉ. दत्ता यांनी दिली.

 

    ऑक्सिजन प्लाँटची पाहणी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेतला. तेथील कोविड वार्डातील खाटांची स्थिती, संख्या, ऑक्सिजनयुक्त खाटा, आयसीयू आदीची त्यांनी पाहणी केली. यावेळी शासकीय मेडिकल कॉलेजच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मेडिकल कॉलेज व मेयो येथील ऑक्सिजन प्लाँटची पाहणी करून ऑक्सिजनची उपलब्धता व क्षमता यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

पोलिसांची पगार खाती Axis Bank मध्ये वळवली, फडणवीस-SBI ला कोर्टाची नव्याने नोटीस

काँग्रेस आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज, दिल्लीत हायकमांडची भेट घेणार?

Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें