Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!

Nagpur | हिंगण्यात लपंडाव खेळत होती मुलं; छतावरील विद्युत तारांनी केला दहावीतील विद्यार्थ्याचा घात!
प्रातिनिधीक फोटो

खेळताना प्रतीकचा हात विजेचा जीवंत तारेला लागला. मुलांना भीती वाटली. बर झालं की त्यांनीही त्याला हात लावला नाही. मामाच्या मुलांनी ही बाब घरी खाली त्यांच्या आईला सांगितली.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 06, 2022 | 10:20 AM

नागपूर : शाळा पूर्णपणे सुरू नाहीत. कधी बंद तर कधी सुरू असतात. त्यामुळं मुलं घरी किंवा घराशेजारीच खेळतात. बुधवारी अशीचं हिंगण्यात काही मुलं घरी खेळत होती. पण, छतावर गेल्यावर तिथं एका विद्यार्थ्याला विद्युत तारांचा स्पर्श झाला. त्यामुळं खेळता-खेळता दहावीतील विद्यार्थ्याला त्याचा जीव गमवावा लागला.

मामाच्या घरी राहायला आला होता

घराच्या छतावर खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा छतावरून गेलेल्या विजेच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाला. यात विजेचा जोरदार धक्का लागल्याने काही क्षणात मृत्यू झाला. ही घटना वाडी शहरात बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वाडीतील प्रतीक संतोष मेश्राम (वय 16, रा. मंगलधाम सोसायटी) असे मृत मुलाचे नाव आहे. विमलताई तिडके विद्यालयात प्रतीक शिकायचा. कोरोना संक्रमणामुळे शासनानं लॉकडाऊन जाहीर केले. प्रतीक त्याच्या आई-वडिलांसोबत अमरावती शहरात राहायला गेला होता. पण, शाळा सुरू झाल्याने तसेच दहावीचे वर्ष असल्याने तो काही दिवसांपूर्वी मामा कैलास गुरादे यांच्याकडे राहायला आला होता. प्रतीक शाळा सुटल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी आला. जेवण आटोपल्यानंतर तो मामाचा छोटा मुलगा व मुलीसोबत घराच्या छतावर लपंडाव खेळायला लागला.

तारांना कोटिंग करण्याची मागणी

प्रतीकच्या मामाच्या घरावरून 11 केव्ही क्षमतेच्या हायव्होल्टेज विजेच्या तारा गेल्या आहेत. खेळताना प्रतीकच्या हाताचा स्पर्श तारेला झाला. यात तो गतप्राण झाला. वाडी, हिंगणा यांसह अन्य काही शहरांमधील काही घरांवरून विजेच्या हायव्होल्टेज तारा गेल्या आहेत. या धोकादायक तारा स्थानांतरित करण्याची किंवा त्याला कोटिंग करण्याची मागणी केली जात आहे.

अशी घडली घटना

खेळताना प्रतीकचा हात विजेचा जीवंत तारेला लागला. मुलांना भीती वाटली. बर झालं की त्यांनीही त्याला हात लावला नाही. मामाच्या मुलांनी ही बाब घरी खाली त्यांच्या आईला सांगितली. वर जाऊन पाहिले तेव्हा प्रतीकचा मृत्यू झाला होता. शेजारच्यांनी पोलिसांत तक्रार केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाजूला केले. वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

Corona | नागपूर शहर आणि शहरालगतच्या तालुक्यांतील एक ते आठच्या शाळा महिनाभरासाठी बंद; आणखी काय नियम आहेत ते सविस्तर वाचा…

Happy Birthday Diljit Dosanjh | मनोरंजन विश्वात येण्याआधी भजन-कीर्तन गायचा, ‘उडता पंजाब’ने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें