पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

आरोपीने पीडितेच्या पतीला महिलेचे अश्लील फोटो पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून 4 लाख रुपये उकळले. त्यानंतरही तो महिलेकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने महिलेचा फोटो तिच्या पतीला पाठवला.

पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक, न्यायालयाकडून सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
पत्नीचे अश्लील फोटो पतीला पाठवून पैसे मागणाऱ्या तरुणाला अटक
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 10:04 PM

मुंबई : महिलेचे अश्लील फोटो काढून तिला पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या एका युवकाला मुंबईतील आरे पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णकांत अखोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला दिल्लीतील कमला विहार येथून अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सेमिनारमध्ये आरोपी तरुण आणि पीडितेची ओळख

आरोपी तरुण आणि पीडित महिलेची ओळख एका सेमिनारमध्ये झाली होती. पीडित महिला 2016 मध्ये बिहारच्या पाटणामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या एका सेमिनारसाठी गेली होती. पीडित महिला या सेमिनारमध्ये वक्ता म्हणून सहभागी झाली होती तर आरोपी तरुण प्रशिक्षणासाठी सहभागी झाला होता. त्यावेळी दोघांची मैत्री झाली होती या ओळखीचे नंतर हळूहळू मैत्रीत रुपांतर झाले. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. दोघांच्याही अनेकदा भेटीगाठी झाल्या. दोघे एकत्र राहत होते. त्यावेळी आरोपीने महिलेचा अश्लील फोटो काढला होता.

नवऱ्यासोबत नातेसंबंध बिघडल्याने महिला आरोपीकडे आकर्षित

सदर घटना घडली तेव्हा महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत नातेसंबंध बिघडले होते. त्यामुळे ती नवऱ्यापासून वेगळी राहत होती. याच दरम्यान ती पाटणा येथे सेमिनारसाठी गेली आणि तिथे आरोपीसोबत ओळख झाली. महिलेला भावनिक आधाराची गरज असल्याचे लक्षात येताच आरोपीने तिच्याशी मैत्री वाढवली आणि आपल्या जाळ्यात ओढत तिच्याशी जवळीक साधली. पैसे लाटण्यासाठी तिचा अश्लील फोटो काढला.

महिला पुन्हा पतीकडे परतल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

मात्र काही वर्षांनी महिला आणि तिच्या पतीमधील बिघडलेले संबंध पुन्हा पूर्ववत झाले. त्यानंतर महिला पुन्हा आपल्याकडे रहायला गेली. मुंबईत गोरेगाव येथील आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात दोघे पती-पत्नी वास्तव्यास आहेत. त्यानंतर आरोपी कृष्णकांत याने महिलेला भेटण्यासाठी अनेक वेळा दिल्लीला बोलावले. मात्र महिलेने नकार दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या पतीला महिलेचे अश्लील फोटो पाठवण्याची धमकी देऊन तिच्याकडून 4 लाख रुपये उकळले. त्यानंतरही तो महिलेकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने महिलेचा फोटो तिच्या पतीला पाठवला. त्यानंतर महिलेच्या पतीने गोरेगाव पूर्व येथील आरे पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक केली. (Young man arrested for soliciting money by sending pornographic photos of a woman to her husband)

इतर बातम्या

जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 21 शेळ्या ठार ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने संपूर्ण नांदेड हादरलं? वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.