पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने संपूर्ण नांदेड हादरलं? वाचा सविस्तर

काही दिवसांपासून शांतामनच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं होतं. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येत होता. आपल्या पत्नीचे दुसऱ्या परपुरुषाशी अनैतिक संबंध आहेत, असे सतत शांतामनला वाटत होते. त्यामुळे दोघा पती-पत्नीत नेहमीच वाद होत असत.

पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ज्याने संपूर्ण नांदेड हादरलं? वाचा सविस्तर
पत्नी व मुलाची हत्या करुन पतीची आत्महत्या

नांदेड : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी आणि मुलाची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. पती शांताराम सोमा कावळे (40), पत्नी सीमा शांतामन (35) व मुलगा सुजीत (11) अशी मयतांची नावे आहेत. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील टाकराळा गावापासून 3 किमी अंतरावर जंगलात ही घटना घडली असल्याची माहिती भोकरचे उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजणगावकर यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

शांतामन कावळे गेली दहा-बारा वर्षांपासून कामानिमित्त मुंबईत राहत होता. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले व हे कुटुंब आपल्या हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या मूळ गावी रहावयास आले. गावात मिळेल काम करुन हे कुटुंब आपली उपजीविका करीत होते. काही दिवसांपासून शांतामनच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं होतं. त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येत होता. आपल्या पत्नीचे दुसऱ्या परपुरुषाशी अनैतिक संबंध आहेत, असे सतत शांतामनला वाटत होते. त्यामुळे दोघा पती-पत्नीत नेहमीच वाद होत असत. शांतामनने 28 नोव्हेंबर रोजी मुंबईला जायचे असल्याचे पत्नीला सांगितले. त्याप्रमाणे शांतामन, त्याची पत्नी सीमा आणि मुलगा सुजीत मुंबईला जाण्यासाठी घरातून निघाले.

हे कुटुंब हदगाव तालुक्यातील टाकराळा गावापासून 3 किमी अंतरावर असलेल्या जंगलाच्या परिसरात पोहचले. या जंगलाच्या आसपास कुठेही मानववस्ती नाही. आजूबाजूला माणसांची कुठेही हालचाल नसल्याचा अंदाज घेत शांतामनने चाकू काढला आणि पत्नी व मुलावर वार करीत त्यांची हत्या केली. पत्नी व मुलाला मारल्यानंतर शांतामनने स्वतः झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

लाकूडतोड्याने मृतदेह पाहिले

टाकाराळा येथील एक लाकूडतोड्या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला होता. या लाकूडतोड्याला शांतामनने प्रेत फासावर लटकलेले दिसले. त्याने ताबडतोब गावात जाऊन गावकऱ्यांना, वनविभागाला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला पाहणी केली असता त्यांना पत्नी व मुलाचाही कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

एक मुलगा नातेवाईकांकडे राहत असल्याने सुखरुप

शांतामन आणि सीमा यांना अभिजीत नावाचा आणखी एक मुलगा आहे. अभिजीत हा गतीमंद असून तो एका नातेवाईकांकडे राहतो. नातेवाईकांकडे राहत असल्याने अभिजीत मात्र यातून सुखरुप वाचला आहे. (Husband commits suicide by killing wife and child in Nanded)

इतर बातम्या

Pune crime |पतीच्या मृत्यूनंतर जोडीदार शोधणे 55 वर्षीय महिलेला पडले महागात ; सव्वा चार लाखांची फसवणूक

Bengal Triple Murder: मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या, एकाला अटक

Published On - 5:32 pm, Mon, 6 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI