
Vanchit Bahujan Aghadi Winning Seat : राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीत कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचार केला होता. पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासारख्या महापालिकांत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. विशेष म्हणजे मुंबई पालिकेवर सत्ता मिळावी यासाठी भाजपा, शिंदे यांच्या महायुतीने तर चांगलाच जोर लावला होता. दुसरीकडे ठाकरे बंधूंनीही मोठी ताकद लावली होती. याच मुंबईत आणि राज्यात इतरही ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीनेही जोर लावला होता. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. या पक्षाचे नांदेड, मुंबई, परभणी, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांत अनेक उमेदवार निवडून आले आहेत. वंचितचे नेमके कोण-कोणत्या ठिकाणी उमेदवार विजयी झाले ते जाणून घेऊ या…
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 7 (ड ) मधून वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले हे विजयी झाले आहेत. याच नांदेड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 7 (अ) मधून वंचित बहुजन आघाडीचे राहूल सोनसळे हेदेखील विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 (क) मधून वंचित बहुजन आघाडीच्या करुणा मेघानंद जाधव विजयी झाल्या आहेत. याच महापालिकेत प्रभाग 3 (ड) मधून वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यासीन खान यांनी विजयी झेंडा फडकवला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 (अ) मधून वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
अकोल्यातही वंचितने दमदार कामगिरी केली असून येथे प्रभाग 14 (ड) मधून वंचित बहुजन आघाडीचे शेख शमशू कमर शेख साबीर हे विजयी झाले आहेत. याच अकोला महापालिकेत प्रभाग 14 (ब) मधून वंचित बहुजन आघाडीच्या जयश्री बहादूरकर या विजयी झाल्या आहेत. अकोल्यातच प्रभाग 14 (अ) मधून वंचित बहुजन आघाडीच्या उज्वला पातोडे या विजयी झाल्या आहेत. अकोल्यात प्रभाग 14 (क) मधून पराग गवई आणि प्रभाग 3 (ड) मधून निलेश देव यांचाही विजय झाला आहे. लातूर महापालिकेत प्रभाग 13 (अ) मधून वंचितचे अमोल लांडगे विजयी झाले आहेत.
दरम्यान, या यशानंतर आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमची आणखी चांगली कामगिरी असेल असे वंचित बहुजन आघाडीने सांगितलेले आहे.