रात्रीच्या प्रवासात कंडक्टरचा आधी महिलेला नको तिथे स्पर्श अन् नंतर पाय पकडून..नागपूरमधील धक्कादायक घटना
रात्रीच्या प्रवासात महिलेला पाहताच कंडक्टरची नियत बिघडली. महिलेला एकटी असलेलं पाहिल्यानंतर कंडक्टरने तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जाणून घ्या त्या प्रवासात महिलेसोबत काय झालं..

Nagpur News : नागपुरात एक खळबळजनक गोष्ट घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करण्याऱ्या महिलेला मोठ्या धक्कादायक प्रसंगाचा समना करावा लागला आहे. तरुणीला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला. नागपूर याठिकाणी रात्रीच्या बसप्रवासात प्रवाशी महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या खासगी कंडक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्ग्या माहिनीनुसार, नागपूर येथून बिंधिया येथे निघालेल्या महिलेवर रात्रीच्या प्रवासादरम्यान लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 7 सप्टेंबरच्या रात्री खासगी बसने महिला एकटी प्रवास करत होती. बस एमपी बस स्टँड परिसरात असताना कंडक्टरने महिलेसोबत गैरवर्तंन केल्याचा आरोप..
एकटी असल्याचा गैरफायदा घेत कंडक्टरने महिलेच्या छातीला स्पर्श करून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला आणि तिचे दोन्ही पाय पकडण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीत नमूद केलं आहे. सीताबर्डी पोलिसांनी महिलेच्या जबाबावरुन लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे..
रात्री नेमकं काय झालं?
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला 7 सप्टेंबरच्या रात्री नागपूरहून बिंधिया येथे जाण्यासाठी एका खासगी बसने प्रवास करत होती. महिलेला एकटीला पाहिल्यानंतर कंडक्टरची नजर फिरली. रात्रीच्या वेळी बस ‘एमपी बस स्टँड’ परिसरात आली असताना ही घटना घडली. महिलेला एकटीला पाहिल्यानंतर त्याने महिलेसोबत अत्यंत अश्लील आणि अयोग्य गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची घटना समोर आली आहे. याआधी देखील बसने प्रवास करणाऱ्या अनेक महिलांवर कठीण प्रसंग ओढावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे महिला देशात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल होईपर्यंत कथित आरोपी कंडक्टरची ओळख पटली नव्हती. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. ट्रॅव्हल्स ऑपरेटरकडून माहिती घेण्यासह अन्य पुराव्यांच्या आधारे कंडक्टरची ओळख पटविण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे… असं देखील सांगण्यात आलं. आता याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
