नागपुरात 12 शाळांना एक सारखाच मेल धडकला; प्रशासनासह पालकांची एकच धावाधाव-पळापळ, पोलीसही अलर्ट

नागपुरात 12 शाळांना एक सारखाच धमकीचा मेल धडकला. त्यानंतर प्रशासनासह पालकांची एकच धावाधाव-पळापळ झाली.

नागपुरात 12 शाळांना एक सारखाच मेल धडकला; प्रशासनासह पालकांची एकच धावाधाव-पळापळ,  पोलीसही अलर्ट
nagpur police
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 2:26 PM

नागपूरच्या नामांकित 12 शाळांना मंगळवारी सकाळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या बॉम्बच्या धमकीने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. बारा शाळांच्या अधिकृत मेलवर धमकीचा मेल धडकला. मुख्याध्यापकांनी कॉम्प्युटरवर मेलग वाचल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली.

सर्व शाळांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार मुलांवर लादत असल्याचा आरोप मेलमध्ये केला आहे. त्यामुळे संपूर्ण शाळाच बॉम्बने उडवून देण्याची आली आहे, अशी धमकी मेलमधून देण्यात आली आहे. बॉम्बेची धमकी मिळालेल्या शाळा या नामांकित आहेत. यात भांडेवाडीतील सेंटर पॉइंट, अजनी, काटोल, वायुसेना नगरच्या शाळांचा समावेश आहे. यासोबत जिल्हा न्यायालयाचाही समावेश आहे. बॉम्बेची धमकी मिळताच संबधित पोलीस ठाण्याला अलर्ट देण्यात आला.

पोलीस तातडीने घटनास्थळी,  शाळा परिसरात तगडा बंदोबस्त 

बॉम्बच्या धमकीची तातडीने गंभीर दखल घेण्यात आली. यानंतर शाळेजवळ पोलिसांची पथके त्वरित दाखल झाली आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील सर्व शाळांमध्ये पोहोचलं आहे. या पथकाने आधी परिसर रिकामा केला. त्यानंतर तपासणी सुरू केली. प्रशासनाने बारा वाजण्याच्या सुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले. शाळा परिसरात अचानक पोलिसांची एन्ट्री झाल्याने एकच खळबळ उडाली. काही पालकांना माहिती मिळताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. शाळा परिसरात कोणताही गोंधळ उडू नये, यासाठी पोलिसांचा (Police) तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले. नागपूरचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी माहिती मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना अलर्ट जारी केला.

खासगीसह सरकारी शाळा उडवण्याची धमकी

नागपूरमध्ये (Nagpur) मेलच्या माध्यमातून काही खासगी आणि सरकारी शाळा उडविण्याची धमकी देण्यात आली. आतापर्यंत 12 शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. ज्या खासगी शाळांना धमकीचा मेल मिळाला. त्या शाळेची तपासणी केली असता बॉम्बसदृश काही आढळलं नसल्याची माहिती हाती आली आहे. खालिस्तानी संस्थेच्या नावाने शाळांच्या मेल आयडीवर धमक्या आल्या होत्या. परंतु या धमकीने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us