AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेटिंग ॲपवरून भेटली, पबमध्ये नेलं अन् बिल येताच जो प्रकार घडला… वाचून उडेल तुमची झोप!

नागपुरात डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना पबमध्ये बोलावून त्यांना ३४ हजारांचे बिल भरण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक फसवणुकीच्या घटनेबाबत सविस्तर माहिती घ्या.

डेटिंग ॲपवरून भेटली, पबमध्ये नेलं अन् बिल येताच जो प्रकार घडला... वाचून उडेल तुमची झोप!
pub
| Updated on: Apr 15, 2026 | 8:51 AM
Share

सोशल मीडिया आणि डेटिंग ॲप्सवरील मैत्री आता नागपूरमधील तरुणांच्या जीवावर बेतत असल्याचे समोर आले आहे. डेटिंग ॲपवर मैत्री करून तरुणांना आलिशान पबमध्ये बोलावायचे, त्यानंतर त्यांना अवाढव्य बिल भरण्यास भाग पाडून लुटायचे, असे सत्र सध्या शहरात सुरू झाले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

एका तरुणाने डेटिंग ॲपवर एका तरुणीशी मैत्री केली. काही दिवस नियमित संवाद साधल्यानंतर त्या तरुणीने आपला विश्वास संपादन केला. यानंतर त्याला प्रत्यक्ष भेटण्यासाठी शहरातील एका पबमध्ये आमंत्रित केले होते. तो तरुण कोणतीही शंका न घेता तिथे पोहोचला. या भेटीदरम्यान त्या तरुणीने महागड्या पेयांची आणि जेवणाची मोठी ऑर्डर दिली. काही वेळातच पबच्या व्यवस्थापनाने त्या तरुणाच्या टेबलावर ३४,००० रुपयांचे अवाढव्य बिल आणून ठेवले.

इतक्या मोठ्या रकमेचे बिल पाहून तरुण चक्रावून गेला. त्याने बिलावर आक्षेप घेत विचारणा केली असता पबचा मालक, व्यवस्थापक आणि तेथील बाऊन्सर्स आक्रमक झाले. त्यांनी त्या तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर, पैसे न भरल्यास बदनामी करु, अशी भीती दाखवली. त्यानंतर त्या तरुणाने जीवाच्या भीतीने आणि मानहानीच्या भीतीपोटी आपल्या UPI अकाउंटद्वारे ३४ हजार रुपये पब मालकाच्या खात्यावर जमा केले. पैसे ट्रान्सफर होताच, ज्या तरुणीच्या आग्रहाखातर तो तिथे आला होता, ती संधी साधून तिथून पसार झाली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास सुरू केला. पबचा मालक, व्यवस्थापक, बाउन्सर आणि संबंधित तरुणी अशा सर्वांविरुद्ध फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

सायबर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान सध्या नागपूर शहरात अशा प्रकारे अनेक टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अनेक पब आणि हॉटेल्स या गुन्हेगारी टोळ्यांशी बांधून असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, डेटिंग ॲप्सवर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना अत्यंत खबरदारी घ्यावी आणि अशा पब किंवा हॉटेलमध्ये जाण्याचे टाळावे. जर कोणासोबत अशी घटना घडली असेल, तर त्यांनी न घाबरता नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. या घटनेमुळे नागपुरातील सायबर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी