AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांना दिवाळीची सर्वात मोठी भेट, देवेंद्र फडणवीसांकडून एकाच बैठकीत 11 गोष्टी मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नवीन नागपूरच्या विकासाला चालना देणारे २१ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात नवीन ॲसेट मॅनेजमेंट आणि परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्यास मंजुरी मिळाली.

नागपूरकरांना दिवाळीची सर्वात मोठी भेट, देवेंद्र फडणवीसांकडून एकाच बैठकीत 11 गोष्टी मंजूर
| Updated on: Oct 22, 2025 | 1:21 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या बैठकीत नवीन नागपूरच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत एकूण २१ महत्त्वाच्या विषयांना मान्यता देण्यात आली. ज्यामध्ये नवीन नागपूरसाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आणि परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्याचा समावेश आहे. राज्य सरकारकडून नवीन नागपूरच्या रहिवाशांना ही विकासाची मोठी दिवाळी भेट मानली जात आहे.

मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश

प्राधिकरणाच्या मालकीच्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुसूत्रता आणण्यासाठी स्वतंत्र ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करण्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. हा निर्णय नागपूर महानगर प्रदेशासाठी फार महत्त्वाचा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  नवीन नागपूरमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. या ठिकाणी रस्ते बाह्यवळण मार्गाला तातडीने जोडण्यात यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार 

याशिवाय, भविष्यात हा बाह्यवळण मार्ग ‘मल्टिमॉडल कॉरिडॉर’मध्ये रुपांतरित होणार असल्याने, त्यासाठी आतापासूनच योग्य तरतूद करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश हद्दीतील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी, सार्वजनिक व खासगी वाहतुकीत समन्वय साधण्यासाठी आणि नवीन व फिडर मार्गाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र नागपूर महानगर परिवहन उपक्रम कंपनी स्थापन करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेमुळे नागपूरकरांना अधिक कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

याबैठकीत मान्यता मिळालेल्या अन्य प्रमुख विषयांमध्ये नागपूर महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, नागपूरमधील तुरूंगासाठी जागा हस्तांतरित करणे, प्राधिकरणात सामाजिक उत्तरदायित्व निधीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडणे, दीक्षाभूमीचे उर्वरित काम पूर्ण करणे आणि प्राधिकरणाचा १५६ पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, यांचा समावेश आहे. तसेच, नागपूर महापालिका क्षेत्रातील प्राधिकरणातर्फे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी नागपूर सुधार प्रन्यासला  कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्याची मान्यता देण्यात आली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...