AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाकात कापूस टाकला, पाय बांधले अन् बोटांची हालचाल झाली… 103 वर्षाच्या आज्जीने यमाला पिटाळलं ! अंत्यविधी ऐवजी झाला वाढदिवस

नागपूर जिल्ह्यातील १०३ वर्षीय गंगाबाई साखरे आजींना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना अचानक तिरडीवर त्यांच्या पायाची बोटं हलू लागली. या चमत्काराने शोकाकुल कुटुंबाला मोठा धक्का बसला. मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या आजींच्या घटनेने सर्वत्र चर्चा सुरू असून, ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

नाकात कापूस टाकला, पाय बांधले अन् बोटांची हालचाल झाली... 103 वर्षाच्या आज्जीने यमाला पिटाळलं ! अंत्यविधी ऐवजी झाला वाढदिवस
103 वर्षाच्या आज्जीने यमाला पिटाळलंImage Credit source: social media
| Updated on: Jan 14, 2026 | 12:34 PM
Share

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण आपण अनेकवेळा ऐकली तर असेल पण नागपूर जिल्ह्यातील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला. संपूर्ण घर शोकाकुल होतं, अंत्यसंस्काराची तयारीही झाली होती. मात्र तेवढ्यात तिरडीवर ठेवलेल्या वृद्ध महिलेच्या पायाची बोटं हलू लागल्याने, समोरच्या लोकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. नागपूर जिल्ह्यातील गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आज्जीला जीवनदान मिळाल्याने हाँ सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावरही ही घटना व्हायरल झाली असून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. जिच्या मृत्यूमुळे घरातल्यांच्या डोळ्यात दु:खाश्रू होते, तिथे अचानक वातावरण बदललं आणि उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यात आस पण चेहऱ्यावर हसू अशी परिस्थिती उद्भवली.

घरच्यांना अश्रू अनावर

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चारगाव येथे हा प्रकार घडला. तिथे राहणाऱ्या गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आज्जींनी यमराजाला पिटाळून लावलं. आणि त्या मृत्यूच्या दाढेतून परत आल्या. गंगाबाई या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या. सोमवारी त्यांचे निधन झाल्याची बातमी पसरली. अचानक त्यांची हालचाल बंद झाली आणि श्वास थांबल्याने त्या गेल्या असं सर्वांना वाटलं. त्यामुळे घरचे शोकाकुल झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.

त्याच्या निधनाची बातमी सर्वांना कळवण्यात आली. इतर कुटंबिय, नातेवाईक, परिचित यांनी त्यांच्या घरी धावही घेतली. काही शोकमग्न लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेजही सोशल मीडियावर टाकले. इकडे गंगाबाई यांच्या घरी त्यांच्या अंत्ययात्रेची सर्व तयारी करण्यात आली. श्वास थांबल्याने त्यांच्या कानात कापूस वगैरे घालण्यात आला. त्यांचा देह तसाच तिथे निश्चल अवस्थेत होता.

 दु:खद वातावरण क्षणात बदललं अन् 

मात्र अंत्यविधीची तयारी सुरु असतानाच अचानक आज्जीने, गंगाबाई यांनी त्यांच्या पायाचे बोटं हलवले. आधी कोणाचा विश्वासच बसेना, पण त्यांच्या पायाची पुन्हा हालचाल झालीय सर्वांना निरखून बारकाईने पाहिल्यावर आज्जी गेल्या नाहीतर तर जिवंत असल्याचे नातेवाईकांना कळले आणि सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे 13 जानेवारी हा आज्जींचा वाढदिवस असतो. त्यामुळे अंत्यंविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी गंगाबाई साखरे यांचा (दुसऱ्या दिवशी असलेला) वाढदिवस आधीच साजरा केला. या घटनेची फक्त नागपुरात नव्हे सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी