मद्यधुंद महिला कारचालकाचा थरार, 3 मुलांसह 7 जखमी, भरधाव कारची एसयूव्हीला धडक, नेमकं काय घडलं
Nagpur News : नागपूर याठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव महिला कारचालकाने एसयूव्हीला धडक दिल्यामुळे तीन चिमुकल्यांसह सात जखमी झाले आहेत. महिला मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप देखील होत आहे.

Nagpur News : नागपूरच्या गोरेवाडा परिसरातील दिनशॉफॅक्टरीजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. . महिलेचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची एका एसयूव्हीला धडक बसली. सेल्टॉस कार चालक महिलेने सात जणांना उडवल्याची माहिती समोर आली असून, तीन चिमुकल्यांसह सात जण अपघातात जखमी झाले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बालू कुलमेथे यांच्या एसयूव्हीला कारने धडक दिली, कारमधून मुलीसह खाली उतरत असताना बालू यांना कारची धडक लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं कारवरील नियंत्रण सुटलेल्या कारने तीन मुलांना उडवलं. रस्त्यावरील हरीश रेवतकर आणि आशीष नखाते यांनाही धडक दिली. अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, महिला चालक नशेत असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच गुट्टीखदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर महिला चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली, अपघातावेळी कारमध्ये आणखी कोण होते, याचाही कसूव तपास सुरू आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. तीन चिमुकली मुले या अपघातात जखमी झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जाणार आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. महिला चालकावर कठोर कारवाईची संतप्त नागरिकांची मागणी करण्यात आलीय..
पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेज
याप्रकरणी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कसून चौकशी करणार आहे. अपघात नेमका कसा झाला. अपघात झाला तेव्हा कारमध्ये कोण कोण होतं. पोलिसांकडून उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
