AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर स्फोटाप्रकरणी पोलिसांचा मोठा दणका, थेट मालकांवरच…

नागपूरच्या SBL कंपनीतील भीषण स्फोट प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये कंपनीच्या दोन मुख्य संचालकांचाही समावेश असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर स्फोटाप्रकरणी पोलिसांचा मोठा दणका, थेट मालकांवरच...
nagpur
| Updated on: Mar 03, 2026 | 7:30 AM
Share

नागपूर जिल्ह्यातील सोलर एक्सप्लोसिव्ह (SBL) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कंपनीचे दोन मुख्य संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायालयाने ९ आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्य संचालकांनाही अटक

नागपूरच्या SBL कंपनीतील स्फोटाप्रकरणी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत कंपनीचे संचालक रवी प्रकाश चंद्र कामरा आणि राकेश सुदर्शन तिवारी यांनाही ताब्यात घेतले आहे. या दोन बड्या नावांच्या अटकेमुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या सुरक्षेतील त्रुटी आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यांमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतींची जबाबदारी असलेले अधिकारी आणि प्रोडक्शन मॅनेजर्स यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात बिल्डिंग १६-A आणि १६-B च्या जबाबदार अधिकाऱ्यांसह लोडिंग आणि प्रोडक्शन सुपरवायझर्सनाही आरोपी करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेले प्रमुख आरोपी

  1. रवी प्रकाश चंद्र कामरा (कंपनीचे संचालक)
  2. राकेश सुदर्शन तिवारी (कंपनीचे संचालक)
  3. चंद्रशेखर ब्रिजमोहन रजवाड (व्हॉइस प्रेसिडेंट)
  4. संदीप हिम्मतलाल सोलंकी (सीनियर जनरल मॅनेजर)
  5. प्रदीप रघुनाथ शर्मा (जनरल मॅनेजर)
  6. रोशन भास्करराव राऊत
  7. नीलकलम ठाणीराम डोंगरे (प्रोडक्शन मॅनेजर)
  8. पंकज रामनरेश पांडे (प्रोडक्शन सुपरवायझर)
  9. सुधाकर रमेश उपरकर (लोडिंग सुपरवायझर)
  10. राजेंद्र देवराव पारधी
  11. विलास अंकुश माळवे (बिल्डिंग इन्चार्ज)

१० जणांचा शोध सुरू; पोलीस पथके रवाना

दरम्यान या प्रकरणात एकूण २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत. ६ दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या स्फोटाचे नेमके तांत्रिक कारण आणि सुरक्षेतील त्रुटींची कागदपत्रे तपासली जाणार आहेत.

नागपूरच्या SBL कंपनीत १ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. नागपूरच्या काटोल तालुक्यातील रावळगाव येथील SBL कंपनीच्या डेटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये हा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १७ कामगारांचा मृत्यू झाला असून २३ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. प्राथमिक तपासात या कंपनीने सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आणि तांत्रिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच