AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

नागपूर शहर पोलीस दलात कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 1500 च्यावर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बाधित झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सगळ्यांना सौम्य लक्षण असून कोणीही रुग्णालयात भरती नाहीत.

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप
पोलीस अधिकाऱ्यांना हायजिनीक किट प्रदान करताना विप्रोचे अधिकारी.
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 02, 2022 | 7:17 AM
Share

नागपूर : शहरांमध्ये रोज कोरोनाचा आकडा वाढतो आहे. कोरोनाने सगळ्या विभागांमध्ये शिरकाव केलेला आहे. तर पोलीस विभागही त्यापासून वेगळा नाही. रोज नागपूरच्या पोलीस विभागातील (Nagpur Police Department) कर्मचारी हे पॉझिटिव्ह येत आहेत. आतापर्यंत नागपूर शहरातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून 1500 च्या वर जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 1176 पोलीस कर्मचारी अधिकारी सध्या ऍक्टिव्ह रुग्ण (Staff officers are currently active patients) आहेत. नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांच्यासह इतर डीसीपी अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. सगळे गृहविलगीकरणात असल्याची माहिती पोलीस रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी दिली. पोलिसांना नेहमी जनतेमध्ये जाऊन काम करावं लागतं. त्यांचा लोकांशी थेट संपर्क येत असतो. त्यामुळे या संसर्गाचा मोठा परिणाम त्यांच्यावर होत आहे. मात्र शहरातील व्यवस्थेच्या दृष्टीने इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी बाधित असल्याने यंत्रणेवर ताण येताना दिसतो आहे.

नागपूर पोलिसांना हायजिनीक किटचे वाटप

कोरोनाच्या काळात विप्रो कंज्युमरतर्फे मदत करण्यात आली आहे. डॉक्टर व पोलिसांनी देवदूत रूपात येऊन अतिशय उत्कृष्ट कार्य केले. जीवाची बाजी लावून शेकडो लोकांचे जीव वाचविले. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत विप्रो कंज्यूमरच्यावतीने नुकतेच नागपूर पोलीस मुख्यालयात पोलीस उपायुक्त संदीप पखाले यांच्याकडे पोलिसांकरिता हायजिनीक किट सुपूर्द केल्या आहेत. यापूर्वीसुद्धा नागपूर पोलीस दलाला हायजिनिक किट, मास्क, थर्मल स्कॅनर मशीन, मेयो रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालयाला हायजिनीक किट, आरटीपीसीआर, बायो कॅबिनेट, पीपीई किटचे विप्रोतर्फे वितरण करण्यात आले. विप्रोचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रमोद दक्षिणकर, एरिया व्यवस्थापक केशव क्रिष्णन तसेच शरद वाजपेयी, गोपाल बेसरकर यांनी या किट्स पोलिसांना प्रदान केल्या.

पोलीस सुरक्षित, तर देश सुरक्षित

कोरोनासारख्या संकट काळात पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीने मोठे काम केले आहे. पोलिसांचे सामाजिक कार्य पाहून नागरिकांनीही त्यांना प्रोत्साहित आणि कौतुक केले. फुटपाथवरच्या गरीब लोकांना पोलिसांनी अन्नाची पाकिटे वाटप केली. त्यामुळे लोकांच्या मनातील पोलिसांविषयी प्रतिमा बदलली आहे. कोरोना काळात अनेक पोलीस आपल्या परिवारापासून दूर राहून सेवा देण्यासाठी जीवापार प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या कार्यामुळे देश सुरक्षित आहे. त्यामुळं पोलीस सुरक्षित राहावे, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे विप्रोचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रमोद दक्षिणकर यांनी सांगितलं.

नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने

Hindusthani Bhau : हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांना एकत्रित जमण्याचे आवाहन, ऑडिओ क्लिप व्हायरल

Breaking : वारीस पठाण यांना इंदुरमध्ये काळं फासलं? पठाण यांनी दावा फेटाळला, मग नेमकं काय घडलं?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...