AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कार्यकर्त्यांना आवाहन

नितीन गडकरी म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांना लागावे लागेल. नागरिकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे. शहरात तीन सर्व्हे करून जनमताचा अंदाज घ्यावा. जनमताचा कल ज्यांच्या बाजूने लोक असतील त्यांनाच निवडणुकीत तिकीट द्यावे.

नागपूर मनपा निवडणुकीच्या तयारीला लागा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कार्यकर्त्यांना आवाहन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 15, 2021 | 12:05 PM
Share

नागपूर : मनपा निवडणुकीच्या कामाला लागा. माजी नगरसेवक, पक्षात काम करणारे माजी पदाधिकारी यांच्याशीही संपर्क वाढवावा. सर्वांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

उमेदवारीसाठी जनमताचा कौल

दिवाळीनिमित्त रामदासेपेठेतील हॉटेलमध्ये भाजप पदाधिकार्‍यांचा स्नेहमीलन कार्यक्रम झाला. यावेळी नितीन गडकरी म्हणाले, येत्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला भाजप कार्यकर्त्यांना लागावे लागेल. नागरिकांमध्ये विश्‍वासाचे वातावरण निर्माण करावे. शहरात तीन सर्व्हे करून जनमताचा अंदाज घ्यावा. जनमताचा कल ज्यांच्या बाजूने लोक असतील त्यांनाच निवडणुकीत तिकीट द्यावे. अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला, असे वाटते. मात्र त्यांनी प्रतिक्रिया न देता पक्षासोबत राहावे, असेही गडकरी म्हणाले.

पदाधिकाऱ्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा

अनेक कार्यकर्त्यांना आत्मविश्‍वास असतो. मात्र निवडणुकीचे निकाल वेगळे लागतात. त्यामुळे नेहमी नागरिकांसोबत राहावे, असेही गडकरी म्हणाले. चुकीच्या निर्णयामुळे अनेकदा दुसर्‍या पक्षाचे वा अपक्ष उमेदवार निवडून येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून पक्षासाठी एकत्र यावे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूर शहरातील आमदार व महानगरपालिकेने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहनही गडकरी यांनी केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून तीन सर्व्हे केले जावे. त्यात जनता ज्याच्या बाजूने असेल, त्याला तिकीट द्यावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी भाजपाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना केली.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी खासदार विकास महात्मे, प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, आमदार विकास कुंभारे, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर संदीप जोशी, मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, अर्चना डेहनकर, संजय चौधरी, बाल्या बोरकर, राम अम्बुलकर, सुनील मित्रा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या 

राज्यात सारं निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून, आम्ही जुळवून घेतलंय, तुम्ही दिवस मोजा; शरद पवारांचा थेट इशारा!

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप