नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही

नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेय. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू आहे.

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही
पोलीस आयुक्त अमितेश कुमार
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 10:59 AM

नागपूर : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदार पोलिसांची आहे. खबरदारीची भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केलीय. त्यानुसार आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम 144 (1) नुसार कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांची धर्मगुरुंशी चर्चा सुरू

नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेय. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू आहे. धार्मिक भावना भडकवणारी अफवा पसरवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिलीय.

सोशल मीडियावर लक्ष

शुक्रवारी 12 नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये जमावाला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या. राज्य सरकारने या घटनांची गंभीर दखल घेत अमरावती येथे कलम 144 लागू केले. नागपुरातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता बघता अमितेश कुमार यांनी रविवारी नागपूर शहरात कलम 144 लागू केली आहे. यानुसार आता 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा हिंसाचार नागपूर शहरातही घडू शकतो अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहर आयुक्तालय अंर्तगत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजवणी करण्याकरिता हा मनाई आदेश लागू केला आहे.

त्रिपुरा येथील घटनेचे अमरावती, नांदेड आणि मालेगाव आदी ठिकाणी तीव्र पडसाद उमटले होते. अमरावती येथे मोठा हिंसाचार झाला. नागपुरात याचे पडसाद उमटण्याची शक्यता बघता रविवारी (ता.14 नोव्हेंबर) रात्री 12 वाजतापासून पोलिसांनी  जमावबंदी आदेश लागू केले. अमितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहे. त्रिपुरा राज्यात काही संघटनांकडून एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरूबाबत आपत्तीजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात 12 नोव्हेंबरला रजा अकादमी, इस्लामिक ऑर्गनायझेशन, अलहज मोहम्मद सय्यद नुरी आदी संघटनांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. नांदेड, अमरावती, मालेगाव, फुसाड, कारंजा या ठिकाणी दगडफेक व जाळपोळसारख्या अन्य तीव्र घटना समोर आल्या.

इतर बातम्या 

Weather Alert: राज्यातून थंडी गायब, अवकाळी पावसाच्या सरी, काय आहे ढगाळ वातावराणाचं कारण?

विहिंप, बजरंग दलावर बंदी का आणू नये? तारीक अन्वर यांचा सवाल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.