AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्या रे जॉनी… म्हणत डोक्यात चापट मारल्याने भयंकर राग, दुचाकीवर येऊन सपासप वार; रात्रीच्या घटनेने नागपूर हादरले; सीसीटीव्ही समोर

आरोपी सोहेलच्या एका मित्राचा मृतक राजकुमार पवार याच्यासोबत काही कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. याच वादाच्या रागातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

क्या रे जॉनी... म्हणत डोक्यात चापट मारल्याने भयंकर राग, दुचाकीवर येऊन सपासप वार; रात्रीच्या घटनेने नागपूर हादरले; सीसीटीव्ही समोर
NagpurImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 26, 2026 | 1:07 PM
Share

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील कावरापेठ परिसरात क्षुल्लक कारणातून एका तरुणाची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेने नागपूर चांगलेच हादरले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्राणघातक हल्ल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राजकुमार पवार असे या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोहेल ऊर्फ जॉनी शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कमरेला लपवून आणलेला चाकू काढून..

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेलच्या एका मित्राचा मृतक राजकुमार पवार याच्यासोबत काही कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. याच वादाच्या रागातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वादानंतर आरोपी सोहेल दुचाकीवरून राजकुमारशी भांडण करण्यासाठी आला होता. यावेळी त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना राजकुमारने ‘क्या रे जॉनी…’ असे म्हणत सोहेलच्या डोक्यावर चापट मारली. या कृतीमुळे सोहेलला अचानक तीव्र राग आला आणि त्याने स्वतःच्या कमरेला लपवून आणलेला चाकू काढून राजकुमारवर सपासप वार केले. चाकूने भोसकल्यानंतर आरोपीने दुचाकीवरून घटनास्थळावरून तत्काळ पळ काढला.

गंभीर जखमी अवस्थेतही दुचाकीजवळ उभा

या जीवघेण्या हल्ल्यानंतर राजकुमार गंभीर जखमी अवस्थेतही काही वेळ आपल्या दुचाकीजवळ उभा होता. मात्र, चाकूच्या वारामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने आणि शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याने तो खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले; परंतु, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो आणि त्यामुळे आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या उमरेड पोलीस या प्रकरणाचा अधिक आणि सखोल तपास करत आहेत.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट