Nagpur Rain : नागपुरात आजही पावसाची बॅटिंग, नरेंद्रनगरातील पुलाखाली पाणी साचले, वाहतूक ठप्प, हवामानाचा अंदाज काय?

विदर्भातील अकराही जिल्ह्यात पडणार चांगला पाऊस पुन्हा येणार आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात चांगला पावसाचा अंदाज आहे. चांगल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा (Consolation to the farmers) मिळाला आहे. सध्या विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडतोय.

Nagpur Rain : नागपुरात आजही पावसाची बॅटिंग, नरेंद्रनगरातील पुलाखाली पाणी साचले, वाहतूक ठप्प, हवामानाचा अंदाज काय?
नरेंद्रनगरातील पुलाखाली पाणी साचले
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 3:17 PM

नागपूर : नागपुरात आजही चांगल्या पावसाने हजेरी लावली. नरेंद्रनगर अंडर ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ब्रिजॉच्या पाण्यात एक ट्रक आणि मिनी डोर बंद पडल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. एक स्कूलबससुद्धा काल बंद पडली होती. ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला रात्रीच एक खांब पडला. त्यामुळे दुसऱ्या बाजूची वाहतूकसुद्धा बंद होती. दोन्ही बाजूने वाहतूक व्यवस्था बंद (Transportation closed) पडली. नागरिकांना ब्रिज बंद असल्याने मोठा त्रास झाला. हवामान विभागाने (weather forecast) मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रिमझिम स्वरूपात सुरू असलेला पाऊस आता चांगला बरसायला लागला. रखडलेल्या पेरण्यांसाठी लाभदायी ठरणार पाऊस आहे. विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. पुढील पाच दिवसांत विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. विदर्भातील अकराही जिल्ह्यात पडणार चांगला पाऊस पुन्हा येणार आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भात चांगला पावसाचा अंदाज आहे. चांगल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा (Consolation to the farmers) मिळाला आहे. सध्या विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात चांगला पाऊस पडतोय.

आयुक्तांनी केले थेट सीओसीमधून समस्यांचे निराकरण

गुरुवारी सात जुलै रोजी दिवसभर पाऊस सुरू होता. शहरातील अनेक भागात पाणी जमा झाले. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. अशा स्थितीत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपा मुख्यालयातील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर (सीओसी) गाठले. शहरातील परिस्थितीची पाहणी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी आयुक्तांनी थेट सीओसीमधूनच प्रशासनाला निर्देश दिले. तात्काळ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले. मनपा आयुक्तांच्या या ऑन द स्पॉट कार्यप्रणालीमुळे शहरातील अनेक भागात नागरिकांना तात्काळ दिलासा मिळू शकला.

शहरात 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरा

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर महापालिका मुख्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर उभारण्यात आले आहे. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या 3 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगरानीत शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाते. शंकरनगर, मानेवाडा रोड, ऑटोमोटिव्ह चौक, कृपलानी चौक, सेंट्रल एव्‍हेन्यू रोड, मेडिकल चौक, विटाभट्टी चौक, कळमना, पारडी यासह शहरातील अन्य भागांचीही आयुक्तांनी पाहणी केली.

मदतीसाठी येथे साधा संपर्क

पावसाळ्यात उद्भवणा-या आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात अग्निशमन विभागाचे 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षामध्ये अधिकारी व कर्मचारी दोन ते तीन पाळीमध्ये सेवा देत आहेत. आपात्कालीन परिस्थितीसाठी मनपा मुख्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये 0712 -2567029, 0712 -2567777 किंवा अग्निशमन केंद्रामध्ये 0712 -2540299, 0712 -2540188 यासह 101 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल. याशिवाय 7030972200 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारेसुद्धा आपली समस्या मांडता येणार आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी मनपाला संपर्क साधावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.