Photo : Vidarbha Rains | पूर्व विदर्भात पावसाचा तडाखा, नागपुरात घरावरील छपर उडली; भंडाऱ्यात अवकाळी पावसानं तारांबळ, वर्ध्यात बच्चेकंपनी आनंदित

पूर्व विदर्भात काल पावसानं हजेरी लावली. काही भागात चांगलाच पाऊस कोसळला. वादळवाऱ्यासह आलेल्या पावसानं नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. त्यानंतर पुन्हा ऊन्ह पडलं. त्यामुळं पावसाळा की, उन्हाळा असा प्रश्न काही वेळासाठी निर्माण झाला होता.

Govinda Hatwar | Updated on: May 25, 2022 | 10:33 AM
1 / 9
जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले. उन्हाच्या लखलखत्या तडाक्यापासून नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचे आगमन झाले. उन्हाच्या लखलखत्या तडाक्यापासून नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.

2 / 9

यंदा लवकर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले. मान्सून पूर्व शेती कामाला आता वेग येणार आहे.

3 / 9

भंडाऱ्यात आलेल्या पावसामुळं बाजारात त्रेधातिरपट उडाली. दुकानं सोडून भाजीपाला विक्रेत्यांना आडोशाला जावं लागलं.

4 / 9

नागपुरात काल झालेल्या वादळी पावसामुळे झाड पडलं. त्यामुळं रस्ता वाहतूक काही काळ खोळंबली होती.

5 / 9

झाड पडल्याने घराचं काही प्रमाणात नुकसान झालं. एका घरावरील छपरंच उडून गेली.

6 / 9

घरावरील छप्पर उडाल्यानं घरात थेट पाणी पडलं. संसार कसा थाटावा असा प्रश्न छप्पर उडालेल्यांना पडला.

7 / 9

सतत उकड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. वातावरणात गारवा निर्माण झाला.

8 / 9

दुपारदरम्यान अचानक पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली तर बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

9 / 9

वर्धा शहरात दुपारदरम्यान विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय. तब्बल वीस मिनिटं झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us