AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ

विशाल त्याच्या स्कूटरनं रात्री नऊ वाजताच्या सुमारास रणजितच्या सांगण्यावरून भिलगावला गेला. तिथे सर्व जणांनी दारू ढोकसली. तिथेच विशालला मारहाण करण्यात आली.

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 23, 2021 | 1:30 PM
Share

नागपूर : कामठी तालुक्यातील वारेगाव शिवारात 22 मार्च 2007 च्या रात्री विशाल पैसाडेचा मृतदेह सापडला होता. खापरखेडा पोलिसांनी त्या प्रकरणाचा 14 वर्षांनंतर तपास लावला. या प्रकरणात आता खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रणजित सफेलकर, विनय बाथव, हेमंत गोरखा, राजू भद्रे, संजय भद्रे, गौरव झाडे व तुषार दलाल यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

असा रचला कट

रणजित सफेलकरने 22 मार्च 2007 च्या रात्री विशाल पैसाडेला घरी बोलावले. त्याने विनय बाथवच्या मदतीनं राजू भद्रेची स्कार्पिओ भिलगाव येथे मागविली होती. हेमंत गोरखालाही बोलावले होते. विशाल त्याच्या स्कूटरनं रात्री नऊ वाजताच्या सुमारास रणजितच्या सांगण्यावरून भिलगावला गेला. तिथे सर्व जणांनी दारू ढोकसली. तिथेच विशालला मारहाण करण्यात आली.

अपघात नव्हे घात

रणजित सफेलकर, हेमंत गोरखा, विनय बाथव यांनी विशालला स्कार्पिओत बसविले. वारेगाव शिवारात पुलाजवळ आणले. मोहम्मद आरीफ हा विशालची स्कूटर घेऊन रात्री साडेबारा वाजता वारेगाव शिवारात आला. तिथे विशालला रोडवर झोपवून त्याच्या डोक्यावर स्कूटर मांडली. रणजितच्या सांगण्यावरून विनयने स्कार्पिओने स्कूटरला धडक देत विशालच्या शरीरावरून नेली. या अपघातात विशालचा मृत्यू झाला, असे दाखविण्यात आले.

अनैतिक संबंधाचा होता संशय

विशाल हा रणजितचा भाऊ कल्लूचा मित्र होता. विशालचे रणजितच्या घरी येणे-जाणे होते. त्याचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा रणजितचा संशय होता. साथीदारांच्या मदतीनं अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची कबुली आता रणजितने पोलिसांसमोर दिली. रणजितची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. या प्रकरणात विनय बाथव याने पोलिसांना खोटे बयाण दिले होते.

Video – Nagpur | रिलायन्सच्या गोदामाला आग, कोट्यवधींचे नुकसान; आगीचे कारण काय?

Gadchiroli | हत्तींची विदर्भात दस्तक! शेतकऱ्यांचे नुकसान; हत्तींनी स्वीकारला अधिवास

Chandrapur | कुठेही थुंकत असाल तर सावध व्हा! थुंकणे पडले चारशे रुपयांना; दोन तासांची कोठडी

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!