महाज्योतीला 150 कोटी मंजूर, नाशिक आणि औरंगाबादला उपकेंद्र होणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती

| Updated on: Sep 06, 2021 | 10:32 AM

मदत आणि पुनर्वसन, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील युवकांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या महाज्योती संस्थेविषयी माहिती दिली आहे. महाज्योती संस्थेचं उपकेंद्र नाशिक आणि औरंगाबाद येथे होणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योतीला 150 कोटी मंजूर, नाशिक आणि औरंगाबादला उपकेंद्र होणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसनमंत्री
Follow us on

नागपूर: मदत आणि पुनर्वसन, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजातील युवकांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या महाज्योती संस्थेविषयी माहिती दिली आहे. महाज्योती संस्थेचं उपकेंद्र नाशिक आणि औरंगाबाद येथे होणार आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. महाज्योतीला राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

महाज्योतीला 150 कोटी मंजूर

ओबीसी आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘महाज्योती’ला निधी मिळाला आणि पूर्ण वेळ एमडीही मिळालेय. त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. नुकतंच अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाज्योती’ला 150 कोटी रु. मंजुर केलेय. त्यापैकी 15 कोटी रुपये रुपये महाज्योतीच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आलेय. शिवाय महाज्योतीला आता पूर्ण वेळ एमडी मिळालेय. त्यामुळे महाज्योतीच्या कामाला आता गती येणार आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी विद्यार्थ्यांच्या विकासाची योजना

“500 विद्यार्थ्यांची यूपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी निवड करण्यात येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. कौशल्य विकास योजनांसाठी 40 हजार विद्यार्थी निवडीचं उद्दीष्ट ठेवलंय. ओबीसींच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सीए पासून नीट पर्यॅत आणि पीएचडी पासून पायलट प्रशिक्षणापर्यॅत विद्यार्थी निवडीची प्रक्रिया जोरात सुरु आहे” अशी माहिती ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. नाशिकमध्ये आणि औरंगाबादला महाज्योतीचे उपकेंद्र सुरु करणार. असंही वडेट्टीवार म्हणाले.

महाज्योती जेईई, नीटचं मोफत प्रशिक्षण देणार

महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (महाज्योती) राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता महाज्योतीच्या वतीने ओबीसी , भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई , नीट आणि सीईटी परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जाणार आहे.

2023 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. शहरी विभागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असणे आवश्यक आहेत.

इतर बातम्या:

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज

Vijay Wadettiwar said Mahajyoti sub centers started at Nashik and Aurangabad