टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (MAha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत (5 September) परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.

टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर
आता 21 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 1:32 PM

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेला (Maha TET) अर्ज भरण्यासाठी (टीईटी) मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 5 सप्टेंबरपर्यंत (5 September) परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. येत्या 10 ऑक्टोबरला ही परीक्षा रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने अर्जांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (extension given to the Candidates to fill up the application form for the TET till September 5)

टीईटीसाठी तब्बल 3 लाख अर्ज

राज्यातल्या अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यात बऱ्याच कालावधीनंतर टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत टीईटीसाठी तब्बल 3 लाख अर्ज आल्याची माहिती आहे.

10 ऑक्टोबरला एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये होणार परीक्षा

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये 10 ऑक्टोबरला एकाच दिवशी ही परीक्षा होणार आहे. 3 ऑगस्टपासून टीईटीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज मागवण्याची अंतिम मुदत ही 25 ऑगस्ट होती. पण आणखी मुदत वाढवण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्या परीक्षा परिषदेने उमेदवारांना दिलासा दिला आहे. या कालावधीत उमेदवारांना प्रलंबित अर्ज आणि अद्याप अर्ज न भरलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

टीईटी परीक्षचे दोन पेपर

साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर

प्राथमिक स्तर ( पेपर एक I) इ. 1 ली ते इ. 5 वी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी उच्च प्राथमिक स्तर (पेपर-दोन II) इ. 6 वी ते इ. 8 वी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणा-या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

अर्ज कुठे करायचा?

टीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वेबसाईटवर https://mahatet.in/ अर्ज दाखल करू शकता.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 13:00 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 10/10/2021 वेळ दु. 14:00 ते सायं. 16:30

परीक्षा शुल्क

सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र., वि.जा. / भ.ज. व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी परीक्षेच्या एका पेपरचं शुल्क 500 रुपये तर दोन्ही पेपरचं एकत्रित शुल्क 800 रुपये आहे. तर अनु. जाती, अनु. जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी एका पेपरचं शुल्क 250 रुपये तर दोन्ही पेपरचं शुल्क 400 रुपये असेल.

पात्रता

टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या :

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज

पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.