पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre) वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं (Online Job Fair) आयोजन करण्यात आलं आहे. यामेळाव्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज
प्रातिनिधिक फोटो

पुणे : कोरोनामुळे (Corona) लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) कित्येक लोकांचा रोजगार हिरावला गेला. अनेकांवर बेरोजगारीची (Unemployment) कुऱ्हाड कोसळली. अनेकांना आजही आर्थिक संकटांचा सामना करावा लागतोय. मात्र, आता अनलॉकमध्ये पुन्हा एकदा रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre) वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं (Online Job Fair) आयोजन करण्यात आलं आहे. यामेळाव्यामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Pune District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre has organized an online job fair)

कोणती पदं असणार, कोण उमेदवार पात्र?

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने 2 सप्टेंबरला हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सेल्स एक्झिक्युटीव्ह, क्वालिटी चेकर, मशिन ऑपरेटर, हेल्पर इत्यादी प्रकारची पदे उपलब्ध असणार आहेत. यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्याच्या आधारावर रोजगार उलपब्ध करून दिला जाणार आहे.

कसा कराल अर्ज?

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने आयोजित केलेला हा पाचवा पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आहे. यामध्ये अधिकाधिक तरूणांनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवरचा अर्ज पूर्ण भरून द्यावा लागेल.

याठिकाणी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी अर्ज करावा लागेल. याबाबत काही अडचण आल्यास 020-26133606 या क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित बातम्या :

तुम्ही नोकरी करत असल्यास हा फॉर्म लवकर भरा, अन्यथा 7 लाखांना मुकणार

Income Tax : हे 5 मोठे नियम बदलले, आता उत्पन्नावर पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार

दर महिन्याला थोडे पैसे वाचवण्यासाठी RD सर्वोत्तम पर्याय, जाणून घ्या फायदा?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI