AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या कारमधून अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर कुठे गेले? सुपर 8 मधील सामन्यापूर्वी घडलं असं काही

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत अभिषेक शर्माने सुमार कामगिरी केली. त्याला अद्याप एकही धाव करता आलेली नाही. असं असताना सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे.

काळ्या कारमधून अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर कुठे गेले? सुपर 8 मधील सामन्यापूर्वी घडलं असं काही
काळ्या कारमधून अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर कुठे गेले? सुपर 8 मधील सामन्यापूर्वी घडलं असं काहीImage Credit source: PTI
| Updated on: Feb 22, 2026 | 3:22 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार सुरू झाला आहे. भारताचा पहिलाच सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण अफ्रिकेचं आव्हान वाटतं तितकं सोपं नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. एखाद दुसऱ्या फलंदाज किंवा गोलंदाजावर अवलंबून चालणार नाही. दुसरीकडे, भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय आहे. त्याला आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात खातही खोलता आलेलं नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीत त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न आहे. अभिषेक शर्मा प्लेइंग 11 चा भाग असेल असं सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत संकेत दिले आहेत. असं असताना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या काही तासाआधी एक मोठा निर्णय घेतला गेला. मिडिया रिपोर्टनुसार, अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर सामन्याच्या दिवशी काळ्या एसयूव्हीतून हॉटेलबाहेर पडले.

खरं तर अभिषेक शर्मा आणि गौतम गंभीर थेट स्टेडियममध्ये गेले होते. तिथे अभिषेक शर्मासाठी खास सराव शिबिराचं आयोजन केलं होतं. तर संघातील इतर खेळाडू हॉटेलमध्येच होते. सामन्याच्या दिवशी बहुतांश खेळाडू मानसिकरित्या सक्षम राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण अभिषेक शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत मैदानात जाण्याचा निर्णय घेतला. स्टेडियममध्ये त्याने स्थानिक गोलंदाजांच्या मदतीने एक खासगी इंडोर नेट सेशन केलं. हे सेशन तीन टप्प्यात विभागलं होतं. हे सेशन 15015 मिनिटांचं होतं. अभिषेकने रिब लाइन गोलंदाज आणि राउंड द विकेट ऑफ स्पिनचा सामना केला. सामन्यातील परिस्थितीशी निगडीत सेशन होतं.

अभिषेक शर्माची ही सीक्रेट प्रॅक्टिस सेशन आत्मविश्वास उंचावण्यासाठी होता. आता अभिषेक शर्मा दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. त्याच्या बॅटमधून थोड्या जरी धावा आल्या तर भारतीय क्रीडाप्रेमींचा डाव भांड्यात पडेल. खरं तर अभिषेक शर्माकडे या स्पर्धेतील शेवटची संधी असू शकते. कारण या सामन्यात शून्यावर बाद झाला तर मग पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये घेणं कठीण होईल. इतकंच काय तर त्याला संधी दिली तरी टीका होईल हे देखील तितकंच खरं आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार