पुण्यात ‘डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश

पुण्यातल्या प्रसिद्ध कॅम्प एज्युकेशन सोसायटीने (Camp Education Society) कौशल्यधिष्ठीत शिक्षणाची गरज ओळखून डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरची (Dr. Cyrus Poonawala Skill Development Center) स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत माफक शुल्कात कौशल्य अभ्यासक्रमांचं शिक्षण दिलं जाणार आहे.

पुण्यात 'डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर'ची स्थापना, कौशल्यविकास कोर्सेसचं प्रशिक्षण, असा घ्या प्रवेश
डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 3:59 PM

पुणे : पुण्यातल्या प्रसिद्ध कॅम्प एज्युकेशन सोसायटीने (Camp Education Society) कौशल्यधिष्ठीत शिक्षणाची गरज ओळखून डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरची (Dr. Cyrus Poonawala Skill Development Center) स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत माफक शुल्कात कौशल्य अभ्यासक्रमांचं शिक्षण दिलं जाणार आहे. 136 वर्षांच्या शतकोत्तर वाटचालीमध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीने नव्या काळात शिक्षणाच्या नव्या वाटा विद्यार्थ्यांसाठी खुल्या केल्या आहेत. (The famous Camp Education Society has set up Dr. Cyrus Poonawala Skill Development Center in Pune)

अभ्यासक्रमात प्रत्यक्षिकांवर भर

डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये प्रत्येक अभ्यासक्रमात प्रत्यक्षिकांवर भर दिला जातो. त्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पूर्णपणे स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक साधनसामुग्री, स्वतंत्र बैठक व्यवस्था, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणारा प्रशिक्षित स्टाफ सेंटरमध्ये आहे. प्रत्येक विभागात बेसिक आणि अॅडव्हान्स असे कोर्स अल्प शुल्कात उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या हे कोर्स करण्यासाठी वयाचं कोणत्याही प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं नाही.

या विभागांमध्ये उपलब्ध आहेत विविध कोर्सेस

संगणक विभाग – या विभागात MS-CIT, ग्राफिक डिझाइन, टॅली, कॉम्युटर डिप्लोमा हे कोर्सेस शिकवले जातात.

टेक्निकल विभाग – यामध्ये मोबाईल, लॅपटॉप रिपेअरिंग, सीसीटीव्ही फिटींगचे कोर्सेस घेतले जातात.

हॉटेल मॅनेजमेंट – कुकरी, बेकरी, हाउस किपिंग, फ्रंट ऑफिस, फूड अँड बेवरेजेस सर्व्हिसेसबाबत शिकवलं जातं.

भाषा अकॅडमी – जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, पोर्तुगीज, या विदेशी भाषांसोबत संस्कृत, मराठी, मल्याळी, उर्दू या भारतीय भाषा शिकवल्या जातात. सोबतच साईन लॅग्वेज, ब्रेल लिपीही शिकवली जाते.

इंटरनॅशनल कॉलेज ऑफ हेअर ब्युटी अँड नेटवर्क मेकअप विभागात हेअर ड्रेसर आणि ब्युटिशियनबाबत प्रशिक्षण दिलं जातं.

फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट या विभागतही अद्ययावत मशिनरींसह प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिलं जातं.

कसा घ्याल प्रवेश?

प्रवेश घेण्यासाठी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर, जान मोहम्मद स्ट्रीट, बाबाजान चौक इथं संपर्क साधावा. अधिक माहिती सेंटरच्या https://www.cyruspoonawallaskillscenter.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

सीबीएसई, आयसीएसई शाळांमध्ये मराठी शिकवली का? शाळांना अहवाल सादर करण्याचे आदेश!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.