‘महाज्योती’ संस्था देणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE, NEET परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण! असा करा अर्ज

महाज्योतीच्या (Mahajyoti) वतीने ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे.

'महाज्योती' संस्था देणार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE, NEET परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण! असा करा अर्ज
महाज्योती

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे (महाज्योती) राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयापासून ते पीएचडीपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता महाज्योतीच्या (Mahajyoti) वतीने ओबीसी (OBC), भटक्या जाती-जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्गातील (SBC) विद्यार्थ्यांना जेईई (JEE), नीट (NEET) आणि सीईटी (CET) परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे. (MahaJyot Institute will provide free guidance to OBC, Nomadic Castes and Special Backward Classes students for JEE, NEET and CET examinations)

दहावी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर (Engineering) आणि मेडिकलसाठी (Medical) तयारी करायची असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने महागडे कोचिंग क्लासेस लावणं शक्य नसतं. अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने हा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जाणार आहे.

कोण विद्यार्थी पात्र?

2023 मध्ये होणाऱ्या जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी यावर्षी विद्यार्थ्यांने दहावी उत्तीर्ण केलेली हवी आणि अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. शहरी विभागात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 70 % तर ग्रामीण, आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% गुण असणे आवश्यक आहेत.

कोणती कागदपत्रं आवश्यक?

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आवश्यक गुणांची गुणपत्रिका, अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यासंबंधी कागदपत्रं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. यासोबत नॉन क्रिमिलेयरचं प्रमाणपत्रंही आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण

महाज्योती संस्थेच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईटी परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सोबतच या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तके, मोफत टॅबलेट आणि दररोज 6 जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.

कसा आणि कुठे करायचा अर्ज?

महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जायचं आहे, तिथे नोटीस बोर्डवर क्लिक करू आपला प्रवेश अर्ज अपलोड करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 25 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख आहे.

संबंधित बातम्या :

MPSC तर्फे संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; परीक्षा ‘या’ तारखेला होणार, ॲडमिट कार्ड जारी

टीईटी परीक्षेसाठी मुदतवाढ, आता 5 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सविस्तर

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI