AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण

नांदेड जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नांदेडमध्ये 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण
| Updated on: Nov 22, 2020 | 7:41 AM
Share

नांदेड : जिल्ह्यात 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 5 हजार 242 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 22 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली आहे. नववी ते बारावी शाळा सुरु होत आहेत. त्याचदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

उद्यापासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 ठिकाणी कोव्हिड तपासणी केंद्र तयार करण्यात आले आहेत. 858 माध्यमिक, उच्चमाध्यमिक शाळांतील शिक्षकांची अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. एकूण 8 हजार 115 शिक्षकांची तपासणी होणार आहे.

45 वर्षाखालील 4हजार 398 शिक्षकांची अँटीजेन टेस्ट तर 45 वर्षावरील 3 हजार 717 शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. आणखी दोन दिवसात उर्वरीत शिक्षकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी कुंडगीर यांनी दिली. नांदेडमध्ये नववी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 89 हजार 532 इतकी आहे.

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसून दिवाळी व इतर सणात नागरिकांची बाजारपेठेतील गर्दी आणि कोरोना नियमाचे उल्लंघन कोरोनाला आमंत्रण देणारे ठरत आहे. राज्य सरकारने शाळा सुरु करताना कोरोना सुरक्षा नियमांची यादी तयार केली असली तरी सर्व नियम कागदावरच असल्याचे मंदिर, प्रार्थनास्थळे उघडल्यानंतर समोर आले होते.

9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करताना विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या लेखी संमतीवर अवलंबून आहे. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिक बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यास पालक व विद्यार्थी यांचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

(Nanded 22 Teachers tested Corona Positive)

संबंधित बातम्या :

धक्कादायक! उस्मानाबादेत 48 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ

Thane School | ठाणे जिल्ह्यातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबईतील सर्व शिक्षकांच्या अँटी पीसीआर चाचण्या, पालिका प्रशासनाचा निर्णय

Mumbai School | दिल्ली इफेक्ट, मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.