Nanded Murder: माझे वडील हारले… 21 वर्षीय आंचलने BFच्या मृतदेहाशी केले लग्न, काळीज पिळवटून टाकणारी घटना

Nanded Murder: प्रेमाची किंमत एवढी भयानक असते, आंचलने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आंतरजातीय विवाहा करणार असल्याचे कळताच मुलीच्या वडिलांनी थेट मुलाचा मर्डर केला. त्यानंतरही मुलीने हार मानली नाही. सक्षम मेला तरी जिंकला असे म्हटले. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

Nanded Murder: माझे वडील हारले... 21 वर्षीय आंचलने BFच्या मृतदेहाशी केले लग्न, काळीज पिळवटून टाकणारी घटना
Nanded Murder case
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 01, 2025 | 3:58 PM

आंचलचा शेवटी गुन्हा काय होता? तिने एका मुलावर प्रेम केले होते, त्याच्यासोबत तिला संसार थाटायचा होता. पण तिच्या भावाला आणि वडिलांना आपल्या मुलीची ही छोटीशी इच्छा मान्य नव्हती. आंचल बॉयफ्रेंड सक्षमसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहात होती. पण तिच्या आयुष्यात तिचेच लोक खलनायक बनून आले. आंचलची सगळी स्वप्ने तिच्या स्वतःच्याच वडील आणि भावांनी चिरडून टाकली आहेत. पण आंचलने इथेच हार मानली नाही. तिथे थेट बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न करत “माझे वडील हारले… सक्षम मेल्यानंतरही जिंकला” असे म्हटले आहे.

वेगळ्या जातीचा होता मुलगा, मुलीच्या कुटुंबीयांनी केली हत्या

महाराष्ट्रातील नांदेड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम केल्यामुळे तिला एवढी मोठी शिक्षा मिळेल, याचा आंचलने कधी विचारही केला नव्हता. आंचलने दुसऱ्या जातीच्या सक्षम ताटेशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तिच्या भावाला आणि वडिलांना हे नाते काही मान्य नव्हते. ते आपल्या मुलीच्या निर्णयाचा सतत विरोध करत राहीले. त्यांना आंचलचा निर्णय आब्रू घालवणारा वाटू लागला होता. आंचलच्या भावाने आणि वडिलांनी सक्षमची निर्घृणपणे हत्या केली. या भयानक हत्येने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. प्रेम केल्याने एवढी भयंकर शिक्षा मिळते का?

वाचा: तीन गोळ्या झाडल्या तरी तो जिवंत होता… मग भावांनी… सक्षमसोबत नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारी घटना

मुलाच्या डोक्यात गोळी झाडली आणि नंतर दगडाने ठेचले

आंचलची सगळी स्वप्ने तिच्या भावाने आणि वडिलांनी उधळून लावली. महाराष्ट्रातील नांदेड परिसरातील ही घटना सर्वांना हादरवून सोडणारी आहे. आंचलच्या भावाने आणि वडिलांनी सक्षमला आधी मारहाण केली आणि नंतर तीन गोळ्या झाडल्या. सक्षम तरीही जिवंत असल्याचे कळताच दोघांनी त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यांनी आपल्या मुलीचा थोडासाही विचार केला नाही.

मुलीने मृतदेहाशी केले लग्न

पण आंचलने आपले प्रेम गमावल्यानंतर असा निर्णय घेतला की, ऐकून-सर्वांना धक्का बसला. आपल्या प्रेमी सक्षमच्या हत्येनंतर ती त्याच्या घरी पोहोचली. अंत्यसंस्कारापूर्वी तिने सक्षमच्या मृतदेहाला, स्वतःला हळद लावली आणि कपाळावर सिंदूर भरले. ती सक्षमची नवरी बनली आणि त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपासून सक्षम आणि आंचल एकमेकांवर प्रेम करत होते. सक्षम हा आंचलच्या भावाचाच मित्र होता. घरी ये-जा करताना दोघे जवळ आले. जेव्हा आंचलच्या भावाला याची चाहूल लागली, तेव्हा त्याने याचा विरोध सुरू केला. सक्षम दुसऱ्या जातीचा होता आणि आंचलने खरे प्रेम केले होते, कोणाचेही ऐकले नाही. आंचलने पोलिसात तक्रार करत सांगितले की, “माझ्या वडिलांनी आणि भावांनी आमचे प्रेम हिरावले, पण ते हरले. सक्षम मेला तरी जिंकला. मी कुणाच्या दबावाखाली नाही. मी सक्षमची आहे आणि आयुष्यभर सक्षमचीच राहीन. माझ्या वडिलांना आणि दोन्ही भावांना फाशीची शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे.”