AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन गोळ्या झाडल्या तरी तो जिवंत होता… मग भावांनी… सक्षमसोबत नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारी घटना

Nanded Crime : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या तरुणीच्या वडिलांनी आणि दोन्ही भावांनी मिळून तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात पीडित तरुणी आंचल मामीडवार हिने स्वतःच्या वडील आणि भावांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिघांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

तीन गोळ्या झाडल्या तरी तो जिवंत होता… मग भावांनी... सक्षमसोबत नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारी घटना
NandedImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 30, 2025 | 12:14 PM
Share

संपूर्ण महाराष्ट्राला हादरुक टाकणारी घटना समोर आली आहे. नांदेडमध्ये एका आंतरजातीय प्रेमाला विरोध करताना तरुणीच्या वडिलांनी थेट मुलाची हत्या केली आहे. मुलाची हत्या करण्यासाठी त्यांनी पोटच्या दोन मुलांची मदत घेतली. या सगळ्या प्रकरणानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत वडील आणि भावांविरोधात तक्रार केली आहे. तसेच तिने तिघांनाही फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. आता प्रकरण नेमकं काय आहे चला जाणून घेऊया…

तीन वर्षांपासून प्रेम, पण जातीमुळे जीव घेतला

२५ वर्षीय सक्षम ताटे आणि २१ वर्षीय आंचल मामीडवार यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आंचलच्या कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते कारण दोघे वेगवेगळ्या जातीचे होते. आंचलच्या वडिलांचे नाव गजानन मामीडवार, तर दोन्ही भाऊ हिमेश आणि साहिल अशी नावे आहेत. या तिघांनीच सक्षमची हत्या केल्याचे आंचलने पोलिसांना सांगितले. आंचलच्या म्हणण्यानुसार, “सक्षमवर याआधी एमपीडीए (MPDA) लावण्यात आला होता. तो सुटून आल्यानंतर माझे वडील आणि भाऊ त्याला ठार मारण्याच्या मागे लागले होते. मला सतत धमक्या मिळत होत्या की, त्याला संपवणारच.”

गोळ्या झाडल्या तरी जिवंत होता, मग…

आंचलने घडलेला प्रकार सांगताना म्हटले की, “त्यांनी सक्षमला गोड बोलून भेटायला बोलावले. नशा करून त्याला बेशुद्ध केले. मग त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या लागूनही सक्षम जिवंत होता. शेवटी माझ्या भावांनी त्याच्या डोक्यात फरशी आणि जड वस्तूने वार करून त्याची हत्या केली.”

मृतदेहाशी लग्न आणि फाशीची मागणी

सक्षमच्या अंत्यसंस्कारापूर्वी आंचलने ठाम निर्णय घेतला. तिने सक्षमच्या पार्थिवाला हळद-कुंकू लावले, मंगळसूत्र घातले आणि त्याच्याशी औपचारिक लग्न केले. रडत रडत ती म्हणाली, “माझ्या वडिलांनी आणि भावांनी आमचे प्रेम हिरावले, पण ते हरले. सक्षम मेला तरी जिंकला. मी कुणाच्या दबावाखाली नाही. मी सक्षमची आहे आणि आयुष्यभर सक्षमचीच राहीन. माझ्या वडिलांना आणि दोन्ही भावांना फाशीची शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा आहे.” ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर आंचलच्या धैर्याचे आणि प्रेमाच्या निर्धाराचे कौतुक होत आहे, तर कुटुंबातीलच लोकांनी केलेल्या या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध केला जात आहे. सध्या तिघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.