AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराणेशाहीची ऐसीतैसी… भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना तिकीट; कारण काय तर…

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांनी पक्षाच्या कठोर निकषांचा हवाला देत या निर्णयाचे समर्थन केले आहे.

घराणेशाहीची ऐसीतैसी... भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना तिकीट; कारण काय तर...
nanded bjp
| Updated on: Nov 20, 2025 | 12:53 PM
Share

नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. नगराध्यक्ष पदासह एकाच कुटुंबातील सहा उमेदवारांना तिकीट देण्याच्या या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आता नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. पक्षाच्या ठरवून दिलेल्या निकषांमध्ये हे उमेदवार बसत असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली आहे. यामुळे पक्षातील कोणीही कार्यकर्ता यामुळे नाराज नाही, असे गजानन सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

गजानन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सहा उमेदवारांपैकी अनेक जण १९९५ पासून नगरसेवक राहिले आहेत. त्यांनी आपापल्या भागाचे सातत्याने प्रतिनिधित्व केले आहे. लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी मला संधी मिळाली आहे. मी विकासाच्या मुद्द्यावर, मागे केलेले काम आणि पुढे करणारे काम जनतेसमोर ठेवत आहे. माझ्या कुटुंबातील ६ उमेदवार रिंगणात असले तरी यापूर्वी ते नगरसेवक होते. त्यांनी त्या त्या भागाचे नेतृत्व केले आहे. १९९५ पासून त्या त्या भागाचे नेतृत्व सूर्यवंशी घराण्याने केले आहे,” असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या कोणाचा अर्जही आला नाही

यावेळी गजानन सूर्यवंशी यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी भाजपच्या कठोर निकषांकडे लक्ष वेधले. पक्षाकडे कोणत्याही उमेदवाराची मागणी नव्हती. पण या ठिकाणाहून दुसऱ्या कोणाचा अर्जही आला नाही. त्यामुळे पक्षाने उमेदवारांसाठी जे निकष ठरवले होते, त्या निकषांमध्ये जे बसले त्यांनाच उमेदवारी दिली आहे, असे गजानन सूर्यवंशी यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संभाव्य आव्हानाबद्दल गजानन सूर्यवंशी यांनी विश्वास व्यक्त केला. लोहा शहरात भाजप नेहमीच मजबूत राहिली आहे आणि भविष्यातही राहील. लोहामध्ये भारतीय जनता पार्टी कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि उद्याही मजबूत राहणार आहे. आम्ही जे उमेदवार दिले आहेत, त्याला लोहा शहरातील जनता सातत्याने आशीर्वाद देत आहे,” असेही त्यांनी म्हटले.

लोहा नगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल

गजानन सूर्यवंशी यांनी लोहा शहराच्या विकासाची रूपरेषा मांडली. यावेळी त्यांनी अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न, पार्किंग, गार्डन, प्लेग्राउंड आणि अन्य अंतर्गत सुविधांसारखी अनेक कामे हाती घ्यायची आहेत. लोहा शहरातील जनता भारतीय जनता पार्टी सोबत आहे, कोण कोणाला ताकद लावतो, याच्याकडे मी कधी बघितलं नाही आणि बघणारही नाही, असे गजानन सूर्यवंशी म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर लोहा नगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल आणि ३ तारखेला (निकाल दिवशी) भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...