AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’ पाहून येताच भररस्त्यात रक्तरंजित थरार, सपासप तलवारी उपसल्या… रुग्णालयातही एकाचा मर्डर; हाणामारीत तिघांचा मृत्यू

नांदेडमध्ये 'धुरंधर' चित्रपट पाहून परतताना मध्यरात्री दोन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये जुन्या वैमनस्यातून भीषण गँगवार झाले. कॅनाल रोडवरील या रक्तरंजित संघर्षात तलवार-चाकूचा वापर होऊन तिघांचा खून झाला, ज्यात एकाची रुग्णालयात हत्या करण्यात आली. या घटनेने नांदेड शहरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'धुरंधर' पाहून येताच भररस्त्यात रक्तरंजित थरार, सपासप तलवारी उपसल्या... रुग्णालयातही एकाचा मर्डर; हाणामारीत तिघांचा मृत्यू
नांदेडमध्ये हाणामारीत तिघांचा मृत्यू
| Updated on: Apr 04, 2026 | 12:21 PM
Share

नांदेडच्या कॅनॉल रोडवर मध्यरात्री अत्यंत मोठा थरार घडला. धुरंधर सिनेमा पाहून येत असतानाच दोन गँगमध्ये झालेल्या वादातून जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत तीन जणांचा खून झाला आहे. नांदेडमध्ये अचानक उफाळून आलेल्या गँगवारमुळे शहरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ तपास सुरू केल आहे. या हाणामारीत एका आरोपीचा घटनास्थळी तर दुसऱ्या आरोपीचा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे.

नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनाल रोडवर ही घटना घडली. मध्यरात्रीचे दीड वाजले होते. एका टोळीतील काही गुंड धुरंधर सिनेमा पाहून आले होते. बाहेर आल्यावर त्यांना दुसऱ्या गँगच्या गुंडांनी हटकले. जुन्या वादावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि हाणामारी सुरू झाली. नांदेड जिल्ह्याच्या अभिलेख (रेकॉर्ड वरील) वरील काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीरने मारामारी झाली. या हाणामारीत एका टोळीतील अर्जित सिंग आणि दुसऱ्या टोळीतील सय्यद अवेज आणि महम्मद अरबाज अशा तिघांचा खून झाला. या प्रकरणी एकमेकांविरुद्ध असे दोन मर्डरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोन्ही टोळीतील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. साई गेहरवाल आणि अर्जित सिंह यांच्या गँगमध्ये ही हाणामारी झालीय. या घटनेनंतर वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असल्याची माहिती भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी दिलीय..

साईलाला गँगने हटकले

दरम्यान या घटनेवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नांदेड शहरातील ई-स्क्वेअर परिसरातील कॅनॉल रोडवर मध्यरात्री रात्री दीड वाजताच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून नांदेड जिल्ह्याच्या क्रिमिनल रेकॉर्डवर असलेल्या दोन गँगमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गँगच्या तिघांचा मृत्यू झालाय. अर्जितसिंग ऊर्फ अजय चव्हाण आणि त्याचे दोन मित्र धुरंधर चित्रपट बघून घरी जातं होते. त्यावेळी साईलाला गँगच्या टोळक्याने अर्जितसिंग आणि त्याच्या साथीदारावर तलवार चाकू घेउन हल्ला केला. यामध्ये अर्जितसिंगचा जागीच मृत्यू झालाय तर त्याच्या सोबतचा एक जण जखमी आहे. तर साई लाला गेहरवाल गँगचे सय्यद आवेज आणि महम्मद अरबाज असे दोघे ठार झाले आहेत, अशी माहिती अबिनाश कुमार यांनी दिली.

रुग्णालयातच मर्डर

विष्णुपुरी येथील सरकारी रुग्णालयात साई गँगच्या जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अर्जितसिंगला रुग्णालयात घेऊन आलेल्या अर्जित सिंगच्या भावाने साई लाला गँगच्या जखमी सय्यद आवेजवर चाकूचे सपासप वार करून त्याला ठार केले, अशी माहितीही त्यांनी दिली.

अर्जितसिंग ऊर्फ अजय चव्हाण याच्यावर गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल होते, शिवाय तो नांदेड वाघाळा नगर पालिका निवडणुकीत प्रभाग 10 मधून उबाठाचा उमेदवार होता. त्याचा या निवडणुकीत पराभव झाला होता. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही बाजूचे चार आरोपी भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून काही पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. यातील आरोपी ही कुख्यात आरोपी असून दोघांजणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

Follow Us
शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण
शिंदेंच्या नगरसेवकाच्या अडचणी वाढल्या! कल्याणमधील डॉक्टारांच्या मारहाण प्रकरणात मोठ ट्वीस्ट, थेट...
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा...
समान नागरी कायद्याबाबत मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांनी केली थेट घोषणा; पुढील 6 महिन्यात...
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार
ज्ञानोबा माऊली... तुकाराम! माऊलींचा पहिला रिंगण सोहळा उत्साहात पार; पंढरपूरकडे पालखीचे भव्य प्रस्थान
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य...
मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील 'ते' वाक्य हिंदीत उच्चारल्याबद्दल राज ठाकरे कडाडले
ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज
Raj Thackeray | ब्रिटिशांचा पूल अजूनही भक्कम, आपले रस्ते काही महिन्यांत खड्ड्यात!; राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं
ते भेटले असतील तर त्यात... पवार-शिंदे भेटीबाबत कॉंग्रेस नेत्याचं मोठं विधान
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले...
तुमच्याच अंगाशी आलं की महाराष्ट्राचा अपमान? राज ठाकरे बरसले; मिसिंग लिंकवरून मुख्यमंत्री फडणवीसांना घेरलं
जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरे काय म्हणाले?
Raj Thackeray | जेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या... राज ठाकरेंनी सांगितलं 2008 साली असं काय घडलं?
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा..
पुन्हा शाळकरी मुलांचा जीव धोक्यात! थेट चौकात झाला भीषण अपघात, रिक्षा उलटली अन् पोरं...
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?