AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात मोठा भ्रष्टाचार, ACB च्या ट्रॅपमध्ये अडकले, नेमकं काय घडलं?

नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघातील रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांच्या पतीला १५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातील या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात मोठा भ्रष्टाचार, ACB च्या ट्रॅपमध्ये अडकले, नेमकं काय घडलं?
narhari zirwal
| Updated on: Feb 25, 2026 | 8:55 AM
Share

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघातील रासेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

नेमकी घटना काय?

रासेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तातडीने या तक्रारीची शहानिशा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ही रक्कम २५ हजार रुपये देण्याचे ठरले.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा विठ्ठल बेडकुळे आणि सरपंच मंदा बेडकुळे यांनी १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

नरहरी झिरवळांचा पाय आणखी खोलात

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नरहरी झिरवाळ हे विविध कारणामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले होते. या घटनेनंतर झिरवळ यांच्यावर टीका होत होती.

यानंतर आता त्यांच्याच मतदारसंघातील आणि त्यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर किंवा लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने विरोधकांनी आता झिरवाळ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. एसीबीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...