AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजेचा झटका लागला आणि थेट टाकीत.. पाण्यालाही करंट; 21 वर्षीय तुरुणाचा भयानक मृत्यू

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणाला बांधकामस्थळी विजेचा झटका लागला. त्यामुळे तो पाण्याच्या टाकीत पडला. पण त्याच्या हातात विजेची तार असल्यामुळे संपूर्ण पाण्याच करंट पास होत होता.

विजेचा झटका लागला आणि थेट टाकीत.. पाण्यालाही करंट; 21 वर्षीय तुरुणाचा भयानक मृत्यू
electric shockImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 07, 2026 | 10:48 AM
Share

सोमेश्वार कानकाटे हा स्थानिक रहिवासी असून तो बांधकामस्थळी काम करत होता. सोमवारी सकाळी तो वीजपंप सुरू करण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी त्याला अचानक जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्याने त्याचा तोल गेला आणि तो पाण्याने भरलेल्या टाकीत कोसळला. त्याच्या हातात असलेली उघडी विद्युत वायरही टाकीत पडली. त्यामुळे पाण्यातही वीजप्रवाह उतरला आणि परिस्थिती अधिक गंभीर झाली.

नेमकं काय घडलं?

घटनेची चाहूल लागताच परिसरातील स्थानिक युवकांनी तातडीने धाव घेतली. त्यांनी फ्यूज काढून वीजप्रवाह बंद केला आणि सोमेश्वरला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, विजेच्या तीव्र धक्क्यामुळे आणि पाण्यात बुडल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून मृत्यूची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठी पोस्टमॉर्टमची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही चौकशी केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांनी बांधकामस्थळी विद्युत सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता बाळगण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी सुरु केली चौकशी

सोमेश्वर कानकाटेच्या कुटुंबीयांना या दुःखद घटनेचा मोठा धक्का बसला आहे. परिसरातील रहिवासी आणि ओळखीच्या व्यक्तींनी त्याच्या कुटुंबाला सांत्वन दिले आहे. युवकाच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी बांधकामस्थळी विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ही घटना विजेच्या बेजबाबदार वापरामुळे होणाऱ्या दुर्घटनांची आठवण करून देणारी आहे. नाशिक पोलिसांनी चौकशी पूर्ण करून नेमकी कारणे उघड करण्याचे आश्वासन दिले आहे.

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी