AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिर्डी, नाशिक सोडा; भोंदू बाबा अशोक खरातचे मुंबई कनेक्शन समोर, मंत्रालयातील तो व्यक्ती कोण?

भोंदूगिरीच्या नावाखाली माया जमवणाऱ्या अशोक खरातच्या मालमत्तेची आता सखोल चौकशी सुरू झाली असून, शिर्डी विमानतळ परिसर आणि नाशिकमधील सनदी अधिकाऱ्यांसोबतच्या भागीदारीचे धागेदोरे समोर येत आहेत.

शिर्डी, नाशिक सोडा; भोंदू बाबा अशोक खरातचे मुंबई कनेक्शन समोर, मंत्रालयातील तो व्यक्ती कोण?
ashok kharat
| Updated on: Mar 24, 2026 | 12:56 PM
Share

स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झाला आहे. आता याप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. सामान्य भक्तांना जाळ्यात ओढून जमवलेली कोट्यवधींची माया आणि बड्या शासकीय अधिकाऱ्यांशी असलेले साटेलोटे आता उजेडात आले आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) आणि आयकर विभागाकडून (Income Tax) समांतर चौकशी सुरु करण्यात आली आहे. आता याप्रकरणी शिर्डीपासून नाशिकपर्यंतचे विविध सातबारा कनेक्शन उघड होताना दिसत आहेत.

बेनामी संपत्तीची आता सखोल चौकशी होणार

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातचे आजोळ राहाता तालुक्यातील काकडी गाव आहे. जे शिर्डी विमानतळाच्या अगदी जवळ आहे. विमानतळामुळे या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. अशोक खरातने याच परिसरात आपल्या ओळखीचा आणि प्रभावाचा वापर करून कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. शिर्डी नगरीतील अनेक मोठ्या हॉटेल्स आणि व्यवसायांमध्ये खरातची गुप्त भागीदारी असल्याचीही धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. या सर्व बेनामी संपत्तीची आता सखोल चौकशी होणार आहे.

तर दुसरीकडे नाशिकच्या पाथर्डी शिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी असलेल्या एका मोक्याच्या ठिकाणच्या ४० गुंठे जागेच्या सातबाऱ्याचा खरातशी संबंध असल्याचे समोर आले आहे. या जागेचा साताबाऱ्यावर एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या (IAS) पत्नीचे आणि अशोक खरातच्या मुलीचे नाव एकत्रितरीत्या आढळून आले आहे. हे अधिकारी पूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत होते. सध्या ते मुंबईत मंत्रालयात वरिष्ठ पदावर आहेत. यावरून खरातने प्रशासनातील बड्या हस्तींना हाताशी धरून जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे.

अशोक खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश

त्यासोबतच आता श्रीरामपूरचे पत्रकार दत्ता खेमनर यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलवले आहे. एक वर्षापूर्वीच त्यांनी आपल्या बातमीतून अशोक खरातच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला होता. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीने खेमनर यांना पाचारण केले असून, ते या घोटाळ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे सादर करणार आहेत. या संवेदनशील प्रकरणात जीविताला धोका असल्याने अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी खेमनर यांना तात्काळ पोलीस संरक्षण दिले आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान आयकर विभाग आता अशोक खरातच्या बँक खात्यांची आणि मालमत्तेच्या व्यवहारांची तपासणी करत आहे. यामध्ये आणखी किती सनदी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तसेच एसआयटीचे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी टाकत आहे.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?