AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड, नॉट रिचेबल असलेला मुलगा…

नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा SIT च्या संपर्कात आला असून आज त्याची आणि खरातच्या मुलीची चौकशी होणार आहे. खरातच्या पोलीस कोठडीचा आज शेवटचा दिवस असून सायंकाळी SIT पत्रकार परिषद घेणार आहे.

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड, नॉट रिचेबल असलेला मुलगा...
Ashok Kharat new photo
| Updated on: Apr 07, 2026 | 12:09 PM
Share

आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेला अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाच्या (SIT) संपर्कात आला आहे. त्यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आज एसआयटीकडून हर्षवर्धन खरात आणि अशोक खरातची मुलगी या दोघांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.

अशोक खरातला अटक झाल्यापासून त्याच्या कुटुंबातील सदस्य पोलिसांच्या रडारवर होते. अशोक खरातच्या कुटुंबातील सदस्यांची भूमिका सातत्याने संशयास्पद वाटत होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन खरातने वडील अशोक खरात यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. आमच्या घरात मोठ्या प्रमाणात कॅश यायची. हे पैसे कुठून आणि कसे यायचे याबद्दल मला माहिती नाही. पण डॅड या कॅशचे नियोजन करायचे. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धन खरातने दिली होती.

हर्षवर्धन खरातने दिलेल्या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी सोडून दिलं होतं. मात्र, त्यानंतर तो अचानक गायब झाला होता. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती. मात्र आता तो पुन्हा संपर्कात आल्याने पोलिसांना या रॅकेटमधील महत्त्वाचे दुवे हाती लागण्याची शक्यता आहे. पण अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्यापही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस

दरम्यान अशोक खरातच्या न्यायलयीन कोठडीची मुदत आज संपत आहे. त्यामुळे आजचा दिवस तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. उद्या (बुधवारी) अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरातने जमवलेली बेनामी मालमत्ता, आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे आणि पीडित महिलांचे जबाब नोंदवण्याचे काम एसआयटीकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच आज विशेष तपास पथक (SIT) एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. या परिषदेत अशोक खरातचे गुन्हे, त्याच्या मुला-मुलीच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले आणि तपासात आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली, याबद्दलचा खुलासा केला जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?