AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! निदा खान प्रकरणी TCSचा मोठा निर्णय, थेट तिला… नेमकं काय झालं?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नाशिक येथील TCS कंपनीमधील महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! निदा खान प्रकरणी TCSचा मोठा निर्णय, थेट तिला... नेमकं काय झालं?
निदा खानImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 20, 2026 | 12:50 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील TCS कंपनी चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. टीसीएस कंपनीने निदा खानविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. तसेच आज निदा खान प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. आता टीसीएसचा मोठा निर्णय नेमका काय आहे ते जाणून घ्या…

नेमकं निर्णय काय?

टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीने निदा खानला सस्पेंड केले आहे. निदा खानवर गंभीर आरोप असल्याने आणि ती सध्या कस्टडीत असल्याने आपल्या कर्तव्यांचे पालन करू शकत नाही, असे कारण देत कंपनीने 9 एप्रिल 2026 रोजी तिला सस्पेंड करण्याचे पत्र दिले आहे. निदा खान 27 डिसेंबर 2021 रोजी टीसीएसमध्ये प्रोसेस असोसिएट म्हणून रुजू झाली होती.

एचआर हेडने घेतला मोठा निर्णय

सस्पेंड ऑर्डर तात्काळ जारी करण्यात झाली असून, त्यात तिचे नेटवर्क अ‍ॅक्सेस बंद करणे, कंपनीचे सर्व सामान परत करणे, ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होमवर येण्यास मनाई, कर्मचाऱ्यांशी या प्रकरणाबाबत संपर्क न ठेवणे आणि पूर्ण गोपनीयता राखणे अशा अटी आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास अतिरिक्त शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश पुणे, नाशिक आणि गोवा प्रदेशाचे एचआर हेड शेखर कांबळे यांनी जारी केले आहेत.

निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. न्यायालय जामीन मंजूर करेल की फेटाळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती आली होती समोर. निदा खानच्या वकिलानी अटकपूर्व जामीनसाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे.  कायद्याचे तज्ज्ञ म्हणतात की, प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता या निर्णयाचा तपास प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

याशिवाय, महाराष्ट्र महिला आयोगाने या आरोपांची चौकशी करण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग समिती स्थापन केली आहे. आज २० एप्रिल रोजी समितीची तिसऱ्या दिवशी देखील चौकशी सुरू आहे. या प्रकरणाने कॉर्पोरेट आणि सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. टीसीएसने आपल्या धोरणानुसार कठोर कारवाई केली असून, कायद्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय आणि आयोगाच्या अहवालानुसार प्रकरणाची दिशा स्पष्ट होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...