Nashik IT company : बुरखा, नमाज आणि दबाव? कर्मचाऱ्यांच्या आरोपांनी खळबळ, HR निदाचा हादरवणारा प्लान समोर
नाशिकमधील नामवंत आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण चांगलंच पेटलं असून त्यातील आरोपींमध्ये कंपनीतील एचआर एक्झिक्युटिव्हचाही समावेश आहे. एफआयआरनुसार, त्यांतिनेनी कर्मचाऱ्यांना बुरखा घालण्यास आणि इस्लामी चालीरीती स्वीकारण्यास भाग पाडले. तिच्याविरोधा नऊ गुन्हे दाखल होऊनही ती अद्याप फरार असून लिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.

नाशिकमधील टीसीएस कंपनीमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात मोठे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव हे एचआर मॅनेजर निदा खान हिचं आहे. सहकारी कर्मचारी तिला ‘दबंग मॅम’ म्हणत असत आणि असं म्हटलं जातं की कार्यालयात तिचा प्रभाव इतका जबरदस्त होता की प्रत्येकजण तिला घाबरायचा. याप्रकरणात ज्या पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवली, एफआयआर दाखल केला, त्यात निदा खानवर अनेक आरोप आहेत.
एफआयआरमधील आरोपांनुसार, निदा खान केवळ एचआरच्या भूमिकेपुरती मर्यादित नव्हती. महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या टीम लीडर्ससोबत ती होती असं दिसून आलं आहे. कसे कपडे घालावेत आणि इस्लामी परंपरांचे पालन कसे करावे याबद्दल तिने महिलांना सूचना दिल्याचेही बोललं जातं. मात्र काही पीडितांच्या मते, हा सल्ला नसून दबाव होता. बुरखा कसा घालावा हेदेखील तिने शिकवलं होतं असा दावा एका महिला कर्मचाऱ्याने केला.
नाशिकमध्ये दाखल झालेल्या नऊ एफआयआरपैकी पहिल्या एफआयआरमध्ये निदा खान हिचं नाव आलं आहे. या प्रकरणांमध्ये असा आरोप आहे की, एका संघटित गटाने महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांचा लैंगिक छळ आणि धार्मिक दबाव आणला. एका पुरुष कर्मचाऱ्यानेही कार्यालयात धार्मिक छळ आणि धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, सात पुरुष आरोपी एका टोळीप्रमाणे काम करत होते. ते सर्व कंपनीत अधिकारपदावर होते आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आपल्या पदांचा वापर करत होते. आमच्याकडे एकटक पाहिलं जायचं, स्पर्श केला जायचा आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली जायची, असा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आ. तसेच त्यांनी यावर आक्षेप घेतल्या, त्यांचा आणखी छळ केला जात असे असंही त्यांनी सांगितलं.
हे तर होतच असतं…
या संपूर्ण प्रकरणात कंपनीतील एचआरच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सांगण्यानुसार, एका महिला अधिकाऱ्याने ‘अशा गोष्टी घडतात’ असे सांगून पीडितेला तक्रार दाखल करण्यापासून परावृत्त केले होते. या वृत्तीमुळे अनेक प्रकरणांमध्ये कारवाई होऊ शकली नाही असाही आरोप आहे. तपासात असेही उघड झाले की, आरोपींनीने एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता, ज्याद्वारे कंपनीचील कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जायचं. एचआर निदा खान हीदेखील या ग्रुपची सदस्य होती असा पीडितांचा दाव आहे.
याप्रकरणातील एफआयआरनुसार, काही केसमध्ये कर्मचाऱ्यांना नमाज म्हणण्यास, मांसाहारी भोजन करण्यास आणि धार्मिक चिन्हे धारण करण्यास भाग पाडले गेलं. एका पीडिते व्यक्तीने तर सांगितलं की, त्याला डोक्यावर टोपी घालून प्रार्थना करण्यास भाग पाडलं गेलं आणि फोटोही काढण्यात आला. तसेच महिला कर्मचाऱ्यांविरुद्ध लैंगिक छळाचे अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत, ज्यात विनयभंग, अश्लील टिप्पणी, धमकावण्याचे प्रयत्न आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल टिप्पणी यांचा समावेश आहे. काही प्रकरणांमध्ये, लग्नाच्या नावाखाली जबरदस्तीने संबंध ठेवल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
आठ जणांना अटक, निदा फरार, शोध सुरू
या केसमध्ये पोलिसांनी आतापर्यंत सात पुरुष आणि एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ आरोपींना अटक केली आहे. मात्र प्रमुख आरोपी असलेली एचआर निदा खान अद्याप फरार असून, तिला शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) छापे टाकत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. या प्रकरणामागे मोठे नेटवर्क किंवा निधीपुरवठा आहे का, याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयडी), दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांसारख्या एजन्सींशीही संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीकडूनही तपास सुरू
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी संपूर्ण प्रकरण गंभीर आणि चिंताजनक असल्याचे म्हटलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असं कंपनीने म्हटलं आहे. लिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला केवळ एकच तक्रार दाखल झाली होती, परंतु समुपदेशन आणि आश्वस्त केल्यानंतर इतर पीडितही पुढे आले. यानंतर एकापाठोपाठ नऊ एफआयआर दाखल झाल्या. सध्या, निदा खान ही या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानली जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, तिच्या अटकेमुळे या प्रकरणात आणखी खुलासे होऊ शकतात. तिचा कसून शोध घेण्यात येत आहे.
निदा खान करायची ब्रेन वॉश
लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा दबाव, याचं हे प्रकरण उघडकीस आल्यापासून, भाजपसह हिंदू संघटनांनी नाशिकमधील कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन मोठा निषेध नोंदवला. तर विरोधी पक्षांनी याला तुष्टीकरणाचं राजकारण म्हणलं आहे. या केसच्या तपासादरम्यान, व्हॉट्सॲप चॅट्समध्ये इम्रान नावाच्या व्यक्तीचे नाव समोर आलं आहे, ज्याचे मलेशियाशी संबंध असल्याचा आरोप आहे. इम्रान प्रक्षोभक भाषणांद्वारे या कर्मचाऱ्यांवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचा संशय आहे. कंपनीची एचआर एक्झिक्युटिव्ह, निदा खान, ही देखील या व्हॉट्सॲप ग्रुपचा भाग होती, असाही आरोप आहे.
चॅट पुन्हा मिळवण्याचे प्रयत्न
कंपनीत असे गैरप्रकार होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी कॅम्पसमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांच्या वेशात चार महिला कॉन्स्टेबलना गुप्तपणे तैनात केले. पोलिसांच्या मते, एचआर एक्झिक्युटिव्ह निदा खान हीच खरी सूत्रधार आहे. या केसमधील आरोपींना देशाबाहेरून निधी मिळत होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. मुख्य आरोपी, एचआर एक्झिक्युटिव्ह निदा खान, हिच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत काही विशिष्ट पद्धती होत्या का, याचाही एसआयटीकडून तपास केला जात आहे.
