AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik TSC Scandal : नवीन आलेल्या तरूणींना ते… कंपनीतील छळ, धर्मांतरण प्रकरणात पीडितेचे धक्कादायक खुलासे

TCS नाशिक प्रकरणात पीडितेने धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यात धार्मिक कट्टरता आणि मानसिक छळाचे आरोप आहेत. कार्यस्थळी अश्लील शेरेबाजी आणि पाठलाग केल्याचा दावा केला असून, यामुळे POSH कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. SIT तपास सुरू असून, सहा संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. हेल्पलाईनवरही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

Nashik TSC Scandal : नवीन आलेल्या तरूणींना ते...  कंपनीतील छळ, धर्मांतरण प्रकरणात पीडितेचे धक्कादायक खुलासे
नाशिक कंपवी स्कँडल
| Updated on: Apr 22, 2026 | 8:27 AM
Share

नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यापासून मोठी खळबळ माजली आहे. तिथे काम करणाऱ्या महिलांशी असभ्य वर्तन, त्यांचे शोषण करणे, एका विशिष्ट धर्माचे पालन करणे,तसे कपडे घालणे यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. या केसमधेये आत्तापर्यंत 7 ते 8 जणांना अटक करण्यात आली असली तर कंपनीची एचआर निदा खान ही अजूनही फरार आहे. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अनेक पीडितांनी पुढे येऊन आपबिती कथन केली आहे. या TSC प्रकरणात SIT ने हेल्पलाईन नंबर जारी केला असून त्यावर देखील काही तक्रारी आल्या आहेत. 20 हुन अधिक तक्रारी आतापर्यंत प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवीन तरुणींना ‘प्लेअर’ म्हणून हिणवल्याचे आरोप

याच केसमध्ये आता एक आणखी नवी अपडेट समोर आली आहे. टीसीएस प्रकरणात पीडितेने धक्कादायक खुलासा केला आहे. धार्मिक कट्टरता आणि वैयक्तिक आयुष्यावर अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. कंपनीमध्ये प्रशिक्षण काळातच संशयितांकडून मानसिक छळ सुरू असल्याचा दावाही तिने केला. पीडितेच्या सांगण्यानुसार, ऑफिसमध्ये नवीन आलेल्या तरुणींना आरोपींकडून ‘प्लेअर’ म्हणून हिणवण्यात यायचं. तसेच आरोपी त्यांना अश्लील प्रश्न विचारायचे,  नको ते हावभाव करायचे आणि जवळीक साधण्याचा प्रयत्नही व्हायचा असा आरोप पीडितेने केला आहे.

एवढंच नव्हे तर धर्मावर आक्षेपार्ह वक्तव्य करत भावना दुखावल्याचा आरोप तिने केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचा पाठलाग करून बाहेर भेटण्यास दबाव टाकण्यात आला होता. जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान तिला सतत छळ सहन करावा लागला, असा दावाही तिने केला.

यामुळे कार्यस्थळी सुरक्षेवर आणि POSH कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पीडित तरूणीने जे आरोप केलेत, SIT तपासात या आरोपांची पडताळणी करण्यास सुरूवात झाली आहे.

सहा संशयितांचा जामिनासाठी अर्ज

दरम्यान टीसीएस प्रकरणात सहा संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या 2 तारखेला सुनावणी होणार आहे. याच कंपनीतील एचआर, संशयित निदा खानच्या वतीने देखील अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने सुनावणी 27 तारखेपर्यत पुढे ढकलली . आता इतर अटकेत असलेल्या 6 संशयित आरोपीच्या वतीने देखील जामिनीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दानिश शेख, आसिफ अन्सारी,तौसिफ अत्तार,शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि शफी शेख या संशयित आरोपींनी जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

हेल्पवलाईनवर आल्या अनेक तक्रारी

नाशिक TSC प्रकरणात SIT कडून तपास सुरू असून याप्रकरणी जारी करण्यात आलेल्या हेल्पलाईन नंबवर देखील तक्रारी आल्या आहेत. आत्तापर्यंत 20 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अनेक तक्रारी धार्मिक भावना दुखावल्या संदर्भात आहेत. यासंदर्भात तक्रारी प्राप्त होत असल्या, तरी पुढे येऊन गुन्हा दाखल करण्यास मात्र कोणी तयार नसल्याने कारवाई करण्यास अडचण येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...